अनिल देशमुखांची दिवाळी ED कोठडीत,माजी गृहमंत्र्यांना कोठडीत असतील या मुभा

अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री उशिरा मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली होती
Mumbai Session court declare ED Custody to Maharashtra former home minister Anil Deshmukh for money laundry case
Mumbai Session court declare ED Custody to Maharashtra former home minister Anil Deshmukh for money laundry case Dainik Gomantak

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री (Maharashtra Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या खटल्यांवर मुंबईच्या सत्र न्यायालयात (Mumbai Session Court) आज सुनावणी झाली. या सुनावणीनंतर अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत (ED Custody)पाठवण्यात आले आहे .अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री उशिरा मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली होती . म्हणजेच दिवाळीपूर्वी देशमुख यांना अटक झाली असून दिवाळीपर्यंत ते ईडीच्या कोठडीत राहणार असल्याचे निश्चित झालं आहे. (Mumbai Session court declare ED Custody to Maharashtra former home minister Anil Deshmukh for money laundry case)

अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची ही सुनावणी दुपारी 12.30 वाजल्यापासून सुरू होऊन 4.15 वाजेपर्यंत चालली. आज तत्पूर्वी, ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्याबाबत न्यायालयात पोहोचले. ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे देखील न्यायालयातउपस्थित होते. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी देशमुख यांच्या १४ दिवसांच्या कोठडीसाठी कोर्टात अर्ज केला मात्र न्यायाधीश पीबी जाधव यांनी अनिल देशमुखला ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

ईडीच्या वतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितले की, अनिल दशमुख चौकशीत सहकार्य करत नाहीत. प्रश्नांची उत्तरे देताना ते टाळाटाळ करतात . मात्र अनिल देशमुख यांच्या वकिलाने ईडीच्या रिमांडच्या मागणीला विरोध केला. ते म्हणाले की, अनिल देशमुख यांनी ईडीच्या तपासात वारंवार सहकार्य केले आहे.आम्ही पुढील तपास आणि चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहोत. ईडीने अद्याप अनिल देशमुख यांना आरोपी बनवलेले नाही. असे असतानाही अनिल देशमुख यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली. म्हणजेच देशमुख हे आरोपी नसून त्यांना संशयित म्हणून अटक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mumbai Session court declare ED Custody to Maharashtra former home minister Anil Deshmukh for money laundry case
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक; नेमके काय आहे प्रकरण?

यावेळी कोर्टात युक्तिवाद करताना अनिल देशमुख यांच्या वकिलांनी त्यांच्या वयाचा हवाला देत, त्यांचं वय सध्या 71 असून त्याची तब्येत सतत खालावत असते देशमुख यांना हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांना खांद्याचा त्रासही आहे त्याचबरोबर त्यांना फेब्रुवारीमध्ये कोविडही झाला होता. अशा परिस्थितीत घरचे जेवण आणि स्वीय सहाय्यक ठेवण्याची मागणी वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून अनिल देशमुख यांना घरचे जेवण मिळणार आहे.

कथित खंडणी रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 तासांहून अधिक चौकशीनंतर सोमवारी रात्री उशिरा ED ने अनिल देशमुख यांना अटक केली होती. ही माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, 71 वर्षीय अनिल देशमुख यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. सकाळी 11:40 च्या सुमारास ते आले आणि मध्यंतरी काही ब्रेक घेऊन दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि चौकशीला योग्य प्रतिसाद न देत असल्यामुळे त्यांना अखेर अटक करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com