Maharashtra HSC Result 2023: बारावीचा आज निकाल; 'या' ठिकाणी ऑनलाईन पाहता येणार रिजल्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 2 वाजता ऑनलाईन रिजल्ट पाहता येणार आहे.
HSC Result
HSC ResultDainik Gomantak

Maharashtra HSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे सारं लक्ष आता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.

  • कुठे पाहणार निकाल

खालील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.

1. mahresult.nic.in

2. https://hsc.mahresults.org.in

3. http://hscresult.mkcl.org

निकालाच्या प्रतीची प्रिंट आउट विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळणार आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्याल्यांना एकत्रित निकाल देखील उपलब्ध होणार आहे.

HSC Result
Nana Patole: महाराष्ट्रात आई आणि गोव्यात गेले की कापून खाई... गोमांसावरून पटोलेंची भाजपवर टीका
  • निकालाबाबत आक्षेप असेल तर काय करायचं?

आज निकाल जाहिर झाल्यानंतर अनेकांना आपल्या निकालाविषयी आक्षेप असू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी, गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल.

यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन (http://verification.mh- hsc.ac.in) विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

यासाठी आवश्यक अटी/शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार 26 मे ते सोमवार 5 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. शिवाय यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

  • पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?

फेब्रुवारी-मार्च 2023 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक राहिल.

ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com