महाराष्ट्रातील भागात मुसळधार पाऊस, कोल्हापुरात NDRF च्या दोन तुकड्या तैनात

महाराष्ट्रातील कोल्हापुरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
Monsoon Update
Monsoon UpdateDainik Gomantak

महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, घाट भागात मुसळधार पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापुरात तैनात करण्यात आल्या आहेत.

(Heavy rains in many parts of Maharashtra, two units of NDRF deployed in Kolhapur)

Monsoon Update
अमरावती हत्याकांडप्रकरणी पोलीस आयुक्त आरती सिंह यांचा नवा खुलासा

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली आणि सर्व संबंधित जिल्ह्यांच्या पालक सचिवांना सतर्क राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले.

मुंबईवर विशेष देखरेख ठेवण्याच्या सूचना

मुंबईतील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गढी नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा थोडी खाली आहे. चिपळूणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून नागरिकांना वारंवार सूचना देऊन सावध करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे

मुंबईत गेल्या 12 तासात 95.81 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्यानेही पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि इतर अनेक भागांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD ने अंदाज वर्तवला आहे की 8 तारखेला मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि 7 आणि 8 जुलै रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com