महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे मराठवाड्यात काहीशी पूरस्थितीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र मुसळधार पावसाने एक ते दोन दिवसांची उघडीप दिली आहे. आता परत येत्या काही चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि त्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या प्रादेशीक हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने दडी मारली होती. त्यानंतर गेल्या सोमवारपासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊसाची सक्रियता वाढू लागली आहे. त्यामुळे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये तसेच नाशिकमधील चाळीसगाव परिसरात मुसळधार पावसामुळे ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे तितुर. डोंगरी, वाडी या उपनद्यासंह गिरणा नदीला पूर आला होता. त्या पुराचे पाणी नदीशेजारील अनेक गावामध्ये शिरले असून 20 गावांचा संपर्क होऊ शकला नव्हता. तर दुसरीकडे गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे एका महिलेसंह गुराढोरांचाही बळी गेला होता. त्यानंतर लगेच एक दिवस आगोदर मुसळधार पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यातच आता 8 सप्टेंबरला मुसळधार सरी बरसणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तविण्यातही आला आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट जारी
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये येत्या चार ते पाच सप्टेंबरला मुसळधार सरी बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सहा सप्टेंबरला कोकणामधील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी तसेच मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोलीत मुसळधार सरी बरसणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. शिवाय, सात सप्टेंबरला खानदेशातील नाशिक मराठवाड्यातील औरंगाबाद त्याचबरोबर कोकणातील पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. तसेच आठ सप्टेंबरला पुणे, पालघर, सातारा, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पाऊसाच्या शक्यतेसंबंधी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.