इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्यामुळे त्याची हत्या केली

काही महिन्यांपूर्वी पीडित मुलाचे चुलत भाऊ आणि त्याच्या मित्राशी भांडण झाले होते आणि त्याने त्या दोघांना बांबूच्या काठीने मारहाण केली होती.
Police 

Police 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय मुलाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यामध्ये त्याने बंदुकीच्या इमोजीसह ‘302 100%’, असे लिहिले होते. ही स्टोरी प्रायवेट असून ती फक्त त्याच्या चुलत भाऊ आणि चुलत भावाच्या मित्राला दिसत होती. यावरून त्या दोघांनी निष्कर्ष काढला की, तो आपला खून करणार आहे व त्याने काही करायच्या आधी या दोघांनी त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Police&nbsp;</p></div>
RT-PCR Test केली नाही म्हणून विधानभवनात कदमांना नो एट्री

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे (Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर सावंत म्हणाले, “पीडित मुलगा घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. कुटुंबीयांना त्याचा मृतदेह सापडल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले व एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला. पोलिसांनी ज्या ठिकाणी शोध घेतला त्यापैकी एका ठिकाणी आरोपी मुलगा सापडला.”

आम्ही आरोपीची कसून चौकशी केली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी पीडित मुलाचे चुलत भाऊ आणि त्याच्या मित्राशी (Friend) भांडण झाले होते आणि त्याने त्या दोघांना बांबूच्या काठीने मारहाण केली होती.

<div class="paragraphs"><p>Police&nbsp;</p></div>
Farmers Suicide: महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरुच!

धिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित मुलाची इंस्टाग्राम (Instagram) स्टोरी बघून ते दोघे घाबरले. त्यांच्यापैकी एकाने त्याच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोनवर बोलण्यास नकार दिला. पीडित मुलाला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीजवळ बोलावण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचल्यावर त्याला चुलत भावाचे फोटो काढण्यास सांगितले. मुलगा फोटो काढण्यात व्यस्त असताना चुलत भावाच्या मित्राने त्याच्या डोक्यावर हातोड्याने हल्ला केला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो खाली कोसळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com