Hari Narke Passes Away: जेष्ठ विचारवंत हरी नरके यांनी 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Hari Narke Passes Away: संस्कृत, कन्नड या भाषांप्रमाणेच मराठीदेखील एक अभिजात भारतीय भाषा आहे
Hari Narke Passes Away
Hari Narke Passes AwayDainik Gomantak
Published on
Updated on

Hari Narke Passes Away: महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष हरि नरके यांचे आज दु:खद निधन झाले आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचे निधन हृदयविकाराने झाल्याची माहीती समोर आली आहे.

प्रसिद्ध मालिका निर्माते, जेष्ठ विचारवंत आणि ब्लॉगर अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. त्यांचा जन्म 1 जून 1963 ला झाला होता. फुलेवादी विचारांचा लढवय्या अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. प्राध्यापक हरी नरके सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात महात्मा फुले अध्यासनाचे चे अध्यासन प्राध्यापक होते.

Hari Narke Passes Away
Corona: महाराष्ट्रावर पुन्हा कोरोनाचे संकट; आढळला ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट

महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन आणि महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा ही त्यांचे गाजलेली पुस्तके आहेत. ओबीसी प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत, कन्नड या भाषांप्रमाणेच मराठीदेखील एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या समितीत मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे. आता त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com