Corona: महाराष्ट्रावर पुन्हा कोरोनाचे संकट; आढळला ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट

Omicron subvariant: महाराष्ट्रात मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एका कोरोनाचे रुग्ण वाढण्याची चिन्हे आहेत. कारण राज्यात नुकताच ओमिक्रॉनचा सबवेरियंट EG.5.1 आढळला आहे.
Omicron Subvariant Found In Maharashtra
Omicron Subvariant Found In MaharashtraDainik Gomantak
Published on
Updated on

Omicron Subvariant Of Corona EG.5.1 Found In Maharashtra:

महाराष्ट्रात मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढण्याची चिन्हे आहेत. कारण नुकताच राज्यामध्ये ओमिक्रॉनचा सबवेरियंट - EG.5.1 आढळला आहे.

महाराष्ट्र जीनोम सिक्वेन्सिंगचे समन्वयक आणि बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश यांनी, महाराष्ट्रात मे महिन्यात EG.5.1 आढळला होता, अशी माहिती दिली होती.

तेव्हापासून दोन महिने उलटून गेले तरीही कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झाली नाही. त्यामुळे, या सबवेरिएंटचा प्रभाव पडलेला दिसत नाही. मात्र याकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात अजूनही XBB.1.16 आणि XBB.2.3 या व्हेरिएंटाच प्रभाव आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जुलै अखेरीस सक्रिय कोविड-19 रुग्णांची संख्या 70 वरून 6 ऑगस्ट रोजी 115 वर पोहोचली.  . 

EG.5.1 सबवेरियंटने अलीकडेच युनायटेड किंगडममध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. यूके मध्ये EG.5.1 सबव्हेरियंटचा वेगवान प्रसार होत आहे. याला "एरिस" असे टोपणनाव देण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर 31 जुलै रोजी हा सबव्हेरियंट आढळल्याचे पुढे आले होते.

Omicron Subvariant Found In Maharashtra
"दिवसाला दोन-दोन हजार किलोमीटर रस्ते बांधणारे, Goa-Mumbai Highway अजून पूर्ण करू शकले नाहीत"

“E G.5.1 हा Omicron XBB.1.9 चा स्ट्रेन आहे, ज्याचा आतापर्यंत भारतातील रुग्णांवर कोणताही गंभीर परिणाम झालेला नाही. परंतु दाखल होणाऱ्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवणे शहाणपणाचे ठरेल."  असे डॉ. राजेश म्हणाले.

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक सक्रिय कोविड प्रकरणे मुंबईत 43 आहेत, त्यानंतर पुण्यात 34 आणि ठाण्यात 25 आहेत.

Omicron Subvariant Found In Maharashtra
हतबल राज्यकर्ते, मस्तवाल कंत्राटदार! मनसेची टिका; मुंबई गोवा महामार्गाबाबतचा व्हिडिओ केला ट्विट

पुण्यातील नोबल हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, “गेल्या १५ दिवसांपासून कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आपण पाहत आहोत. अलीकडेच रुग्णालयात एक कोविड मृत्यूची नोंद झाली आहे.

आम्ही गेल्या 15 दिवसांत 10 हून अधिक कोविड प्रकरणे पाहिली आहेत आणि बहुतेक सौम्य होती. तीन रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झाले. ते एकतर वृद्ध होते किंवा त्यांना गंभीर आजार होते."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com