ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी पदे आता रद्द होण्याची शक्यता

एकच पद निर्माण करण्याची राज्य सरकारच्या ही हालचाली सुरु
Gramsevak
GramsevakDainik Gomantak
Published on
Updated on

गावाच्या विकास प्रक्रियेत प्रशासकीय अधिकारी म्हणून महत्वाचा दुवा असणारे ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे पद आता रद्द होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. ( Gram Sevak and Village Development Officer posts are now likely to be canceled )

Gramsevak
राज ठाकरे मागणार माफी? मनसे प्रमुखांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदाराचा विरोध

त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारनेही ही पदे रद्द करून एकच पद निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतनश्रेणी, पदोन्नती आदींबाबत समिती सविस्तर अभ्यास करणार असून त्यानुसार नवीन पदासाठी नियमावली ठरवली जाणार आहे. समितीने आता सहा महिन्यांचा अहवाल द्यावा, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Gramsevak
महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून नवीन पद निर्माण करण्याची गरज व त्याचे कारण या समितीला देण्यात आले आहे. पगार, वेतनश्रेणी, नियतकालिक पदोन्नती, आर्थिक गणना आणि इतर बाबींचाही अभ्यास करून सहा महिन्यांत सरकारला अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान, ग्रामसेवक हा गावाचा प्रशासकीय अधिकारी या नात्याने काम करत असतो. मात्र, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली होती. राज्यातील ग्रामसेवक संघटनेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची मागणीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली होती.

या साठी राज्यातील २३ हजार ग्रामसेवकांनी २ दिवसांचा संपही केला होता. या माध्यमातून त्यांचे विविध प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडले होते. त्यामध्ये ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करण्यात येऊन त्या ऐवजी पंचायत विकास अधिकारी या पदाची निर्मिती करावी ही प्रमुख मागणी संघटनेने केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com