गोष्ट पैशापाण्याची : इंग्रजीबहूल दुकानात मराठी पुस्तकाला मानाचं स्थान

प्रकाशनापूर्वीच विक्रम रचणाऱ्या या पुस्तकाला क्रॉसवर्डसारख्या नामांकित इंग्रजीबहुल दुकानांमध्येही चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.
Goshta Paisha Panyachi Book
Goshta Paisha Panyachi BookDainik Gomantak
Published on
Updated on

प्रकाशनापूर्वीच इतिहास घडवणाऱ्या प्रफुल्ल वानखेडे लिखित ‘गोष्ट पैशापाण्याची’ पुस्तकाला आता इंग्रजीबहुल पुस्तक दुकानांमध्येही मानाचं स्थान मिळत आहे. ‘सकाळ प्रकाशन’तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. मुंबईतील प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. प्रकाशनापूर्वीच विक्रम रचणाऱ्या या पुस्तकाला क्रॉसवर्डसारख्या नामांकित इंग्रजीबहुल दुकानांमध्येही चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

‘गोष्ट पैशापाण्याची’ पुस्तकाने बाजारात दाखल होण्यापूर्वीच तब्बल 18 हजार पुस्तकांच्या नोंदणीचा विक्रम केला आहे. इतकंच नाही तर अॅमेझॉनवरील विक्रमी पहिल्या तीन पुस्तकांच्या यादीत स्थान मिळवणारं गोष्ट पैशापाण्याची हे पहिले पुस्तक ठरलं आहे. पुस्तक बाजारामध्ये प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी उपलब्ध झाल्यावर एकाच दिवशी हजारापेक्षा अधिक प्रती विक्रीचा विक्रम याआधी जगप्रसिद्ध लेखिका जे. के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटर पुस्तकाने केला आहे.

Goshta Paisha Panyachi Book
kantara Movie पाहून CM सावंतांना आठवले गोव्यातला 'दैव'! वाचा 'वीरभद्र'विषयी

सर्वसाधारणपणे मराठी प्रकाशन व्यवसायात पुस्तकाची एक आवृत्ती साधारणतः एक हजार प्रतींची असते. मात्र याला अपवाद ठरत ‘गोष्ट पैशापाण्याची’ पुस्तकाने हे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. चौथ्या आठवड्यामध्ये 18 हजार प्रतींचा टप्पा या पुस्तकाने गाठला आहे. या बहुचर्चित पुस्तकाची पहिली आवृत्ती 30 हजार पुस्तकांची आहे. त्यामुळे एक आवृत्ती 30 हजार प्रतींची असणे हादेखील मराठी प्रकाशनविश्वातील एक विक्रम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com