Konkan Railway News: गणेश चतुर्थीनिमित्त प्रवाशांसाठी 24 डब्यांची खास रेल्वेगाडी

13 सप्टेंबरपासून आठवड्यातून तीन वेळा धावणार
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak

Konkan Railway News: कोकण रेल्वे व्यवस्थापनाने गणेश चतुर्थी सणाच्या दिवसांमध्ये होणाऱ्या प्रवाशांच्या संभाव्य गर्दीचा विचार करून एक खास गाडी कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते कुडाळ व परत असा या गाडीचा मार्ग असणार आहे.

Konkan Railway
Goa Assembly Session 2023: अवैध ऑनलाइन गेमिंगला आळा घालणार; गोवा सरकार अभ्यासणार तामिळनाडूचा कायदा

ही गाडी 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात धावणार आहे. आठवड्यातून तीन वेळा ही रेल्वेगाडी धावणार आहे.

रेल्वे क्रमांक 01185 ही गाडी लोकमान्य टिळक स्थानकाहून दर सोमवार, बुधवार व शनिवार असे तीन दिवस 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान दुपारी 12.45 वाजता ही गाडी सुटेल आणि कुडाळला 11.30 वाजता पोहोचेल.

तर रेल्वे क्रमांक 01186 ही गाडी कुडाळहून सोमवार, बुधवार व शनिवारी दुपारी 12.10 वाजता सुटेल व लोकमान्य टिळक स्थानकावर रात्री 13.35 वाजता पोहोचेल.

ही रेल्वेगाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्र्वर, रत्नागिरी, अदवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधदुर्ग या स्थानकांवर थांबेल. या गाडीला एकूण 24 डबे असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com