चिमुरड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अपहरण केलं पण शेवटी तो गुन्हाच

फूटपाथवर आढळलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाचा एका मजूराला लळा लागला आणि त्या मुलाच्या भविष्याची चिंताही मजुराला वाटू लागल्याने मजुराने मुलाचं अपहरण केलं.
kidnapped little child
kidnapped little childDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई : फूटपाथवर आढळलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाचा एका मजूराला लळा लागला आणि त्या मुलाच्या संगोपणाचा विचार त्याच्या डोक्यात आला, त्या मुलाच्या भविष्याची चिंताही मजुराला वाटू लागल्याने मजुराने मुलाचं अपहरण केलं. मात्र त्याचा उद्देश चांगला असला तरीही त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील घाटकोपर भागामध्ये ही घटना घडली. घाटकोपरच्या भटवाडी विभागातील फूटपाथवर प्रिन्स शिंदे या अवघ्या दोन वर्ष आणि आठ महिन्यांच्या चिमुकल्याचं मेहबूब शेख या 52 वर्षीय मजुराने 19 मे रोजी अपहरण केलं होतं.

प्रिन्स शिंदे नावाचा हा मुलगा औरंगाबाद इथे राहणाऱ्या सानू नावाच्या व्यक्तीच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा आहे. दरम्यान सानूच्या आईने तिची मुंबईत राहत असलेली मैत्रीण वैष्णवी खानला गेल्यावर्षी प्रिन्सचा सांभाळ करण्यास दिलं होतं. ही वैष्णवी देखील मजूर असून भटवाडीच्या फूटपाथवर राहते. म्हणून तिच्याबरोबरच प्रिन्सही राहू लागला. याच फूटपाथवर मेहबूबही राहत होता. हळूहळू प्रिन्स आणि मेहबूबची चांगली ओळख झाली. त्यांच्यातला जिव्हाळा वाढू लागला आणि मेहबूब सगळ्यांना तो आपला नातू असल्याचं सांगू लागला. त्याला जेवायला घालणं, आंघोळ घालणं, त्याची काळजी घेणं अशी सर्व कामं मेहबूब करायला लागला होता. या छोट्या बाळाचं आयुष्य असं फूटपाथवर जाऊ नये, त्याचं भविष्य आणखी उज्ज्वल व्हावं याची काळजी मेहबूबला वाटू लागली होती. आणि अखेर मेहबूबने वैष्णवीकडून त्या मुलाचं अपहरण करण्याचा निर्णय घेतला.

kidnapped little child
अनलॉक करण्याची घाई नको; 7 जिल्ह्यांना जास्त काळजी घेण्याची गरज

19 रोजी प्रिन्सला घेऊन मेहबूबने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या जवला गावातील आपल्या बहिणीच्या घरी पोहचला. इकडे वैष्णवीने दोन दिवस या दोघांचा शोध घेत होती. मात्र तो सापडला आला नाही. यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्यात प्रिन्सच्या अपहरणचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक उमेश सावंत, मैत्रानंद खंदारे, पोलीस उपनिरीक्षक मोहन जगदाळे, महेश शेलार, अनिल बांगर आणि अश्विनी पाटील या सात जणांच एक पथक तयार करुन मेहबूब आणि प्रिन्सचा शोध घेण सुरू केलं. तपास केला असता पोलिसांनी माहिती मिळाली की, मेहबूब अहमदनगर जिल्हयात आहेत. आणि पोलिसांनी मेहबूबला जवला गावात गाठले.

kidnapped little child
चंद्रपुर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअरभागात सफारी करण्यास परवानगी

पोलिसांनी मेहबूबला ताब्यात घेत त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आणि प्रिन्सला पुन्हा फूटपाथवरील आयुष्य लाभू नये यासाठी त्याला बाल कल्याण केंद्राकडे देण्याचा निर्णय घाटकोपर पोलिसांनी घेतला. मेहबूब नावाच्या या मजुराला प्रिन्सचा लागलेला लळा, त्याच्यावर असलेलं प्रेम आणि त्याच्या भविष्याची चिंता वाटत असली तरी त्याचं अपहरण करणं हा गुन्हा असल्याने पोलिसांनी मेहबूबला अटक केली आहे. मात्र आता प्रिन्सचं भविष्य या सगळ्या प्रकारामुळे तरी चांगलं होइल अशी अपेक्षा घाटकोपर पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com