अखेर शाहरुखची 'मन्नत' पूर्ण, आर्यन खान तुरुंगातून बाहेर

काल कागदपत्रे वेळेवर न पोहोचल्याने आर्यनची (Aryan Khan) सुटका लांबली. परंतु आज सकाळी 11 च्या सुमारास आर्यन खानची आखेर सुटका झाली.
आर्यन खानची  सुटका
आर्यन खानची सुटका Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह (Aryan Khan) अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मिळाला आहे. मात्र, जामीन मंजूर करण्यासोबतच न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. जे तीनही आरोपींना जामीन कालावधीमध्ये पाळाव्या लागणार आहेत. जामीन आदेशानुसार तिन्ही आरोपींना दर शुक्रवारी एनसीबीच्या (NCB) मुंबई कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे एनडीपीएस न्यायालयाच्या परवानगीशिवाय तो देश सोडून जाऊ शकत नाही. काल कागदपत्रे वेळेवर न पोहोचल्याने आर्यनची सुटका लांबली. परंतु आज सकाळी 11 च्या सुमारास आर्यन खानची आखेर सुटका झाली. गेल्या 26 दिवसांपासून आर्यन खान तुरुंगात होता.

आर्यन खान 11.2 मिनिटांनी तुरुंगातून बाहेर आला

आर्यन खान 11.2 वाजता तुरुंगातून बाहेर आला. शाहरुख खानच्या सुरक्षारक्षकांनी लगेचच रेंज रोव्हर गाडीचा मागचा दरवाजा उघडला. काही सेकंदातच आर्यन खान मागच्या सीटवर बसला आणि मीडियाच्या कॅमेऱ्यांना टाळत मन्नतकडे निघून गेला. माध्यमांपासून अंतर ठेवण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. रेंज रोव्हर वाहनाच्या मागील सीटवर कोण बसले आहे, याबाबत काहीही सांगता येत नाही. पण आर्यनसोबत जो बसला आहे, तो शाहरुख खान की गौरी खान? गाडीला लावलेल्या काळ्या काचेमुळे सस्पेन्स कायम आहे.

आर्यन खानची  सुटका
नवाब मलिकांनी पॉर्न रॅकेटसंदर्भात आरोप केलेला ‘दाढीवाला’ कोण?

मन्नत बाहेर चाहत्यांची गर्दी

आर्यन खान थोड्याच वेळात मन्नतला पोहोचेल. मन्नतच्या बाहेर वेगवेगळ्या पोस्टर्स आणि बॅनरसह चाहत्यांची गर्दी जमली आहे. आर्यन खानच्या स्वागतासाठी पोस्टर आणि बॅनरवर वेगवेगळे संदेश लिहिले गेले आहेत. एका पोस्टरवर लिहिले आहे- 'स्टे स्ट्रॉंग प्रिन्स आर्यन'. आर्यन खानला 25 दिवसांनंतर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. शुक्रवारी निर्धारित मुदतीत त्याचा जामीन आदेश कारागृहात पोहोचू शकला नाही. त्यामुळे शुक्रवारी आर्यन तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही.

कूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी त्याला 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. आर्यन खानसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा देखील आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. अरबाज संध्याकाळी बाहेर येणार असल्याची माहिती समोर येत आहे.आर्यन खानला 14 अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यन खान देश सोडून जाऊ शकणार नाही. त्याला सहआरोपींच्या संपर्कात राहावे लागणार नाही. दर शुक्रवारी त्याला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com