मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाल्यापासून महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधत आहेत. क्रूझवर पडलेला छापाही खोटा असल्याचे मलिकांनी म्हटले आहे. त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाही असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. तपास यंत्रणेमध्ये सामील असलेला हा दाढीवाला व्यक्ती कोण? याचा शोध तात्काळ घेण्यात यावा. त्याचबरोबर समीर वानखेडे यांच्याशी या दाढीवाल्या व्यक्तीचे काही नाते आहे का? ते ही त्यांनी स्पष्ट करावे असही मलिकांनी म्हटले होते. मात्र आता त्या दाढीवाल्याचा पर्दाफाश झाला आहे.
मंत्री नवाब मलिक ज्या दाढीवाल्या माणसाबद्दल बोलत होते त्याचं नाव काशिफ खान (Kashif Khan) आहे. तो फॅशन टीव्ही इंडियाचा एमडी आहे. मलिक यांनी म्हटले की, 'काशिफ खानवर देशात अनेक गुन्हे दाखल आहेत. काशिफचे समीर वानखेडे यांच्याशी संबंध आसल्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही.'
मलिक यांनी काशिफवर मोठ्या प्रमाणावर पॉर्न रॅकेट चालवल्याचा आरोपही केला आहे. काशिफने कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन केले होते. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत या पार्टीत पोहोचला होता. काशिफची गर्लफ्रेंड रुक्मिणी हुड्डा हिचे बंदुक सोबत असतानाचेही काही फोटोही आहेत. काशिफला अनेकवेळा फॅशन शोमध्ये पाहिले गेले आहे.
नवाब मलिकांनी यांनी काशिफबद्दल म्हटले की, 'काशिफ खानचा तिहार तुरुंगामध्येही काही काळ मुक्काम राहिलेला आहे. काशिफ जेव्हा भोपाळमध्ये एफ. सलूनच्या उद्घाटनासाठी आला होता तेव्हा भोपाळच्या जनतेने जंगी स्वागत केले होते.'
समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने काशिफ खानला क्रूझवर जाण्याची परवानगी का दिली याची चौकशी एनसीबीने करावी, असा सवाल नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. नवाब मलिकांनी काशिफ खानवर ड्रग पार्टी आयोजित करणे, पोर्नोग्राफी रॅकेट चालवणे आणि सेक्स रॅकेट चालवत असल्याचेही आरोप केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.