महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेची भुमिका काय ? असा सवाल आता राजकिय वर्तूळात चर्चा सूरु आहे. असे असताना शिवसेनेवर नामुष्की ओढवणार का ? अशी स्थिती आहे. यापार्श्वभूमीवर शिवसनेने एकनाथ शिंदे यांना गटनेटे पदावरून हटवलं असून त्यांच्याजागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. (Eknath shindes expulsion from the post of shivsena group leader )
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी काही वेळापुर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्या मध्ये ते म्हणतात की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.
गद्दारांना माफी नाही, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिक संतापले
शिवसेना भवनवर आता सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवसैनिक एकत्र येत आहेत. यावेळी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शिवसैनिक म्हणाले की, गद्दारांना शिवसेनेत माफी नाही. ते मुंबईत कसं पाऊल ठेवताय हे बघूच. असा सज्जड दम ही यावेळी शिवसैनिकांनी भरला आहे. असे असले तरी गुजरातमध्ये गेलेले आमदार मुंबईत परतल्यानंतर ते शिवसेनेत परततील असा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यामूळे शिवसेना राजकिय पटलावर खेळत असलेल्या चाली योग्य ठरणार का ? हे येणारा काळंच ठरवेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.