शिवसेना बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार - शरद पवार

आघाडी सरकारला कोणताही धोका नाही - शरद पवार
sharad pawar uddhav thackeray
sharad pawar uddhav thackerayDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात गेल्या काही तासांपासून नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडीत शिवसेनाला मोठ खिंडार पडले आहे. त्यामूळे महाविकास आघाडीचे सरकार यापूढे ही टीकणार का ? असा प्रश्न विचारला जात असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पत्रकाक परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचा म्हटले आहे. ( ShivSena crisis Sharad Pawar claims Maharashtra government is running well )

sharad pawar uddhav thackeray
महाराष्ट्रात रातोरात राजकीय भूकंप घडवणारे एकनाथ शिंदे आहेत तरी कोण?

विधान परिषद निवडणुक निकालानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. तर गुजरातमधील हॉटेलमध्ये महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट थांबली असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. याशिवाय शिवसेनेच्या इतर 21 आमदारांशीही पक्ष संपर्क करू शकत नाही. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुपारी 12 वाजता आमदारांची बैठक पार पडली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला नाही.

sharad pawar uddhav thackeray
आदित्य ठाकरेंचा वाढता हस्तक्षेप एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे कारण? उद्धव सरकार अडचणीत येण्याची 5 कारणे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भुमिका मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केल्या नंतर स्पष्ट करणार असल्याचं यांनी म्हटले होते. आणि मुख्यमंत्री ठाकरे याबाबत अद्याप काही बोलले नाहीत. त्यामूळे शिवसेना खरंच सत्ता उतार होणार का ? महाराष्ट्रात पुन्हा भाजप सत्ता स्थापणार का ? या प्रश्नाचे उत्तर सध्या नसले तरी येत्या काही तासांत महाराष्ट्राच्या जनतेला हे समजणार आहे.

असे असताना सध्या शिवसेनेचे अनेक आमदार राजस्थानला पोहोचले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच भाजप नेते संजय कुटे यांच्यासह अनेक भाजप नेते ही राजस्थानमधील एका हॉटेलमध्ये प्रवेश करत असल्याचं सध्याचं चित्र आहे. त्यामूळे शिवसेनेचे आमदार खरंच भाजपच्या गळाला लागले की काय ? हा संशय बळावत असल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com