विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतून खदखद बाहेर येत आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे राज्यातील उद्धव ठाकरे सरकार अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रात दुसरीकडे मात्र ते वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. (Eknath Shinde Shiv Sena Maharashtra Political Crisis Sanjay Raut Uddhav Thackeray Updates)
महाराष्ट्राच्या राजकीय संकटात गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन बीएलयू (Radisson BLU) सध्या चर्चेचे केंद्र बनले आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी या हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत.
अखंड महाराष्ट्र आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय बंडाचा साक्षीदार होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघत आहे. एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर काही आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडानंतर आता शिंदे गटात दिवसागणिक आमदारांची भर पडताना दिसून येत आहे.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे, तर त्यातच शिवसेनेनं बॅकफूटवर येत महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) बाहेर पडण्याची तयारी देखील दाखवली आहे. पण त्यास कोणताही प्रतिसाद शिंदे गटाकडून देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य काय असेल हे पाहणं आता महत्वाचे असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.