शिवसेना बंडखोर नेत्यांचा आसामधील हॉटेल खर्च तब्बल 69 लाख रुपये

हॉटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली माहिती
Assam Hotel
Assam HotelDainik Gomantak
Published on
Updated on

आसाम, गुवाहाटीतील एका रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये शिवसनेचे बंडखोर नेते आठ दिवस तळ ठोकला होता. काय हाटील, काय डोंगार, काय झाडी असे वर्णन केले होते ते याच हॉटेलचे. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी आपण ओकेमधी हाय असे रांगड्याभाषेत वर्णन केले होते. याच हॉटेल मध्ये खान - पानासाठी बंडखोर आमदारांनी तब्बल 68-70 लाख रुपये उडवल्याची बाब समोर आली आहे. बुधवारी त्यांनी बिले मंजूर केली, असे हॉटेलच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Assam Hotel
अमरावतीत उदयपूरसारखी घटना! अमली पदार्थ विक्रेत्याची हत्या, NIA टीम पोहोचली तपासासाठी

एकीकडे आसामचे नागरिक महापूरात बळी जात असाना या नेत्यांनी केलेला खर्च आता चर्चेचा विषय बनला आहे. तसेच या नेत्यांनी हातात कारभार येण्यापूर्वीच हा पराक्रम केला आहे. तर सत्ता हातात असताना कसा कारभार असेल हे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त केली जात आहे. एकूण बिलावर हॉटेलचे अधिकारी डोळेझाक करत असले तरी सूत्रांनी सांगितले की, जलुकबारीजवळील गोतानगर येथे असलेल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहण्यासाठी त्यांना 68-70 लाख रुपये देण्यात आले.

Assam Hotel
जाणून घ्या, उपमुख्यमंत्रीपदाची भूमिका काय

महाराष्ट्रातील आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी हॉटेलच्या वेगवेगळ्या मजल्यांमधील एकूण 70 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. हॉटेलने 22 जून ते 29 जून या कालावधीत अनिवासी पाहुण्यांसाठी रेस्टॉरंट्स, मेजवानी आणि इतर सुविधा बंद केल्या होत्या. "महाराष्ट्राचे आमदार हॉटेलमध्ये सामान्य पाहुणे म्हणून थांबले. त्यांनी जाण्यापूर्वी बिले मंजूर केली. कोणतेही पैसे बाकी नाहीत," असे हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलच्या वरच्या खोल्यांचे भाडे सुमारे 7,500 रुपये आणि डीलक्ससाठी 8,500 रुपये असते. सवलत आणि करानंतर हा आकडा अंदाजे 68 लाख रुपये आहे.GST सह, दोन प्रकारच्या खोल्यांसाठी देय रक्कम सुमारे 7,280 रुपये आणि एका रात्रीसाठी 8,400 रुपये प्रति व्यक्ती आहे. हॉटेलमध्ये काही उत्कृष्ट खोल्या आणि सुमारे 55 डिलक्स खोल्या आहेत.

बंडखोर आमदारांचे एकूण जेवणाचे बिल सुमारे 22 लाख रुपये असल्याचे मानले जात आहे. पाहुण्यांनी इतर कोणत्याही सशुल्क सेवांचा लाभ घेतला का असे विचारले असता, हॉटेलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "त्यांनी फक्त त्या सुविधा वापरल्या ज्या खोलीच्या भाड्यात मोफत उपलब्ध आहेत. स्पा सारखी इतर कोणतीही शुल्क आकारणी उपयोगिता त्यांच्याकडून घेतली गेली नाही. अशी ही माहिती यावेळी समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com