महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची धाड पडली आहे.
Anil Parab
Anil ParabDainik Gomantak
Published on
Updated on

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मालमत्त्यांवर सकाळी ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आले. (ED action against Maharashtra Transport Minister Anil Parab)

Anil Parab
गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण,12 लाखांचे होते बक्षीस

तसेच अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीची धाड पडली आहे. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानीही ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे असे वृत्त समोर येत आहे.

किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सचिन वाझे तसेच 100 कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचे नाव याआधी समोर आले होत. परबांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही ईडीला मोठं घबाड हाती लागलं होतं. मनी लॉंडरिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Anil Parab
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल

अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टवर देखील छापेमारीचे सत्र सुरू झाले आहे. सध्या महाराष्ट्र राज्यसभेच्या जागेवरून शिवसेना जोरदार चर्चेत आली आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने मतदान करण्यास नकार दिल्यानंतर आज संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेसाठी अर्ज दाखल करतील. त्याआधीच ही कारवाई झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. पोलीस खात्यात बदल्यांचं रॅकेट अनिल परब यांच्यामार्फत सुरू असल्याचा संशय यंत्रणांना आला आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा देखील आरोप केला होता. सोबत अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणातही परबांचा पाय खोलात गेला आहे.

तसेच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय यंत्रणांना आला आहे. त्यातूनच या कारवाईला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com