Mumbai Goa Highway: मुंबई गोवा वाहतूक पुन्हा ठप्प; बोरघर येथे महामार्गावर आले पाणी!

कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प; बोरघर येथे महामार्गावर आले पाणी!
Mumbai Goa HighwayDainik Gomantak

कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या पावसामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुंबई गोवा महामार्ग देखील बंद झाला आहे. महामार्गावरील बोरघर बस स्टॉप येथे नदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. मात्र लोक धाडस करुन स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यातून वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करतायेत.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या नदीने सकाळीपासून रौद्ररुप धारण केले होते. यामुळे महामार्गा शेजारी असणाऱ्या गावांमध्ये जाणारे बरचसे पूल सकाळापासून पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प; बोरघर येथे महामार्गावर आले पाणी!
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आंदोलन; रस्त्यावरच भरवली शाळा!

काही दिवसांपूर्वी, मुंबई-गोवा महामार्गावर पेडणे येथे पुन्हा दरड कोसळल्याने दोन्ही लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती. मालपे न्हयबाग येथे रस्ता कडेला संरक्षक भिंतीवरील तांबड्या मातीचा भराव रस्त्यावर आल्याने महामर्गावरील वाहतूक बंद झाली. पंधरा दिवसात त्याच भागात दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडली होती.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग ठप्प; बोरघर येथे महामार्गावर आले पाणी!
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 3 दिवस रोज 4 तास महामार्ग राहणार बंद

सध्या कोकणासह राज्यात पावसानं धूमशान घातलं आहे. सकाळापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. दरम्यान, गोव्यासह महाराष्ट्रात हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट वर्तवण्यात आला होता. तसेच, गरज असेल तर लोकांनी बाहेर पडावे असे आवाहनही करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com