
मुंबई: समाजात तुमचे मोठे स्थान नसेल किंवा खिशात १०० कोटी रुपये नसतील तर लालबागच्या राजाच्या दर्शनाला येऊ नका, अशी उद्विग्न पोस्ट एका सूरतच्या भाविकाने रेडिटवर लिहली आहे. भाविकाने लालबागच्या दर्शनाला आले असता बहीण, आई – बाबांना शारीरिक त्रास झाल्याचे नमूद केले, तसेच, याठिकाणी असलेल्या नियोजनाच्या अभावाचा देखील उल्लेख केला.
रेडिट या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ओळख गुप्त ठेऊन नेटकऱ्यांना मत व्यक्त करता येते. यात इंडिया या सबरेडिटवरुन मसाला गाय या नावाच्या व्यक्तीने मत व्यक्त केले आहे. लालबागच्या राजा येथे धक्कादायक अनुभव आला, नियोजनाचा अभाव, जखम आणि शून्य मानवता, याचा अनुभव.
"लालबागच्या राजाचे चरण दर्शन घेण्यासाठी मी आणि माझे कुटुंब सूरतवरुन मुंबईला प्रवास करुन आलो. अध्यात्मिक अनुभवाचे धक्कादायक गैरनियोजन आणि अमानवी अनुभवात रुपांतर झाले."
"माझ्या लहान बहिणीला डोक्याला इजा झाली. माझ्या आईच्या हातावरचा कपडा फाटून जखम झाली. आईला तेथील कर्मचाऱ्यांनी जोरात धक्का दिला. खेळती हवा नसल्याने बाबांना चक्कर येऊन ते खाली कोसळले, यावेळी मंडळाचे सदस्य किंवा पोलिस मदतीला धावले नाहीत."
"दरम्यान, अभिनेत्यांना शांततेत दर्शन मिळते, त्यांच्यासाठी मंडप मोकळा केला जातो. पण, हजारो मैल प्रवास करुन येणाऱ्या भाविकांना जनावरांसारखी वागणूक दिली जाते. बाबांची तब्येत खालावल्यामुळे दर्शन न घेताचा आम्ही माघारी फिरलो."
"दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दान मिळून देखील गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही किंवा वैद्यकीय मदतची सोय नाही," पुरावा म्हणून त्याने फोटो देखील सोबत सोडले आहेत.
‘बाप्पा खूप दिवसांपूर्वी ते ठिकाण सोडून गेलेत, आता लोकांनी देखील जावे,’ अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली आहे.
बाप्पा खूप दिवसांपूर्वी आपल्याला सोडून गेलेत, तो आता केवळ उद्योग झाला आहे, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा पण हेच सत्य आहे. ते आता केवळ स्टेट्स सिम्बॉल झाले आहे. बाप्पा मला माफ करा पण, तेथील लोक तुमचे भक्त नाहीयेत. तुमच्या नावाखाली फक्त पैसा कमावला जात आहे, अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने दिली आहे.
"लालबागच्या दर्शनाला जाऊ नका, तिथे खूप गर्दी आहे, एवढी गर्दी की तिथे केव्हाही चेंगराचेंगरी होऊ शकते. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसून, नियोजनाचा आभाव आहे. लोकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देणे आणि त्यांच्या ओरडने त्यांना ढकलणे याचा त्यांना अभिमान वाटतो," अशी दुसऱ्या एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.