एक लॉरी बंद पडली, दुसरी उलटली; जांबोटी - चोर्ला - गोवा मार्गावर रात्रीपासून दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प

Traffic Jam On Jamboti-Chorla-Goa road: प्रशासनाच्या वतीने बंद पडलेली वाहने आणि उलटलेला ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Huge Traffic On Jamboti-Chorla-Goa road
Jamboti-Chorla-Goa roadDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: चोर्ला घाटातील वाहतुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जांबोटी - चोर्ला - गोवा मार्गावर रात्रीपासून वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यात एक लॉरी बंद पडली असून, दुसरी लॉरी रस्ता खचल्याने उलटली आहे. यामुळे मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जांबोटी - चोर्ला - गोवा मार्गावर एक मोठी लॉरी बंद पडली आहे. तर, त्याच ठिकाणी दुसरी लॉरी रस्ता खचल्याने उलटली आहे. यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रात्रीपासून रस्ता बंद असल्याने मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. प्रशासनाच्या वतीने बंद पडलेली वाहने आणि उलटलेला ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Huge Traffic On Jamboti-Chorla-Goa road
Goa Education: गोवा शालेय परीक्षांबाबत मोठी अपडेट! 3री ते 8वी च्या प्रश्नपत्रिका दुसऱ्या राज्यातील एजन्सी काढणार

मुळातच अरुंद असलेला चोर्ला घाटातील रस्ता दोन ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकल्याने त्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. रात्रीपासून मार्गावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. वाहनांसह प्रवासी एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत. ट्रक मार्गातून हटविल्यानंतरच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ट्रक मार्गातून हटविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com