मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने(Heavy Rains) कोकण(Kokan),पश्चिम महाराष्ट्रात(Maharashtra) पूरामुळे(Floods In Maharashtra) मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवित हानी झाल्याने या अनेक लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. रग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. या परिस्थितीत ऊर्जामंत्री नितीन राऊत(Nitin Raut) यांनी पूरग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे.जो पर्यंत तिथली परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पूरग्रस्त भागात वीज बिल(Light Bill) वसुली करू नका, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. ज्यावेळी ही परिस्थिती व्यस्थित होईल त्यावेळी वीजबिल भरायला सवलत देऊ असेही त्यांनी सांगितले आहे मात्र वीजबिल माफीचा निर्णय अद्यापझाला असून तो निर्णय मंत्रिमंडळ घेईल असे सप्ष्टीकरणही नितीन राऊत यांनी दिले आहे. (Don't pay the electricity bill immediately ... State government's relief to the flood victims)
मागच्या अनेक दिवसांपासून राज्य नेहमी नैसर्गिक संकटांना तोंड देत आहे, मागील दोन वर्षांपासून राज्यात सतत वादळे येत आहेत, अनेकदा जोरदार पावसानेही राज्याला जोरदार तडाखा दिला आहे. आणि यात सर्वात जास्त नुकसान ऊर्जा विभागाचेच झाले आहे. आणि यावरच कायमस्वरूपी उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यासाठी केंद्रीय स्तरावरही काही मदत लागणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बोलणार असल्याचे सांगितले आहे.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मागीलआठवड्यात आलेल्या पुराने चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झालं आहे ते पाहणी करून त्यांनी पुरामुळे नादुरुस्त झालेले मीटर ग्राहकांना त्वरित बदलून देण्याचे निर्देश राऊत यांनी यावेळी महावितरणला दिले आहेत. तसेच अशा परिस्थितीत सुद्धा ज्या कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिली त्यांचे कोतकही त्यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.