पंतप्रधानांनी मेट्रोचं तिकीट काढून प्रवास केला, आम्ही विनातिकीट! आमच्याकडूनही पैसे वसूल करा: देवेंद्र फडणवीस

महापालिका योजना उद्घाटन समारंभाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली यावेळी ते बोलले की, पुण्यासाठी आज स्वप्नपुर्तीचा दिवस आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावरती आले आहेत. पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या एक टप्प्याचे मोदींच्या हस्ते लोकार्पण त्यांनी केले आहे. त्यानंतर त्यांची MIT नेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली तर यामुळे पुण्यात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. (Devendra Fadnavis has stated that river development works will be done in Pune soon)

Devendra Fadnavis
PM Modi in Pune: PM मोदींच्या सभेत अजित पवारांचा राज्यपालांना टोला

महापालिका योजना उद्घाटन समारंभाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली यावेळी ते बोलले की, पुण्यासाठी आज स्वप्नपुर्तीचा दिवस आहे. येत्या काळात पुणे महानगरपालिका 100 टक्के प्रदुशण मुक्त होणार आणि पुण्यात ई-बसेस धावणार. पुणेकरांसाठी आज हक्कांची बस धावली आहे.

तर पंतप्रधानांनी स्वत: मेट्रोचं तिकीट काढून आपल्या मोबाईल वरुन तिकीटेचे पैसे भरले आहेत, आणि त्यांनी मेट्रोचा प्रवासही केला, मात्र आम्ही विनातिकीट फिरत आहोत, आमच्याकडूनही तिकीटाचे पैसे वसूल करा असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. दरम्यान, नद्यांमध्ये आता सांडपाणी जाणार नाही, पुण्यातील नद्यांचा विकास होणार. त्यासोबतच त्यांनी महानगपालिकेचे (Municipal Corporation) देखील कौतुक केलं आहे, महानगपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती लावली आहे, त्यामुळे पुण्याचे नाव आणखीनच मोठे झाले आहे असं ही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com