धक्कादायक! विलगीकरणाच्या भीतीने 4 दिवस घरात ठेवला वडीलांचा मृतदेह

मृतदेह घरात असल्याने पुढे त्या तणावात आलेल्या दोन बहीनींपैकी एकीने आत्महत्या केली, तर दुसरीने देखील...
Covid-19 Death Body
Covid-19 Death BodyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतात कोरोना विषाणुमुळे (Covid-19) निर्माण झालेल्या महामारी आणि महामारीमुळे झालेल्या वेगवेगळ्या परिणामांमुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. तर कोवीड-19 च्या भीतीमुळे देखील कित्येक लोकांनी आपला जीव गमावला आहे. अशाच भीतीमुळे विरार (Virar) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्यला क्वारंटाईन व्हावे लागेल या भीतीने दोन बहीनींनी आपल्या वडीलांचा मृतदेह तब्बल चार दिवस घरात ठेवला. ही घटना एवढ्यावरच थांबली नाही. हा मृतदेह घरात असल्यामुळे तणावात आलेल्या मुलींनी थेट आत्महत्येचा निर्णय घेतला.

पश्चिम विरारच्या गोकूळ टाऊनशिपमधील ब्रोकलीन अपार्टमेंट येथे राहणाऱ्या 72 वर्षीय हरिदास सहरकर हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. हरिदास सहरकर यांचे 1 ऑगस्टला निधन झाले. कोरोनामुळे निधन झाल्याचा धक्का घेतलेल्या मुलींना आता आपल्याला क्वारंटाईन व्हावे लागेल या भीतीने मुलींनी त्यांचा मृतदेह तब्बल 4 दिवस घरात ठेवला. मृतदेह घरात असल्याने पुढे त्या तणावात आल्या आणि त्यातील एका बहीणीने आत्महत्या केली.

Covid-19 Death Body
Amaravati: महेश राव आता घरीच बसा, Insta reel करणाऱ्या कॉन्स्टेबलवर कारवाई

हे प्रकरण इथेच थांबत नाही! बहीणीने आत्महत्या केल्याने अजुनच घाबरलेल्या दुसऱ्या बहीणीने देखील समुद्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास ही गोष्ट आली त्यांनी पोलीसांना बोलावले. पुढे पोलीसांनी केलेल्या चौकशीत हा सगळा प्रकार उघडकीस आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com