Covid-19 Impact: महामारीमुळे घटला मुंबईतील जन्मदर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी या घसरणीची अनेक संभाव्य कारणे सांगितली आहे.
Covid 19 pandemic lower birth rate in Mumbai

Covid 19 pandemic lower birth rate in Mumbai

Dainik Gomantak

Published on
Updated on

मुंबई: मुंबई (Mumbai) भारतातील (India) सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर,मात्र मागील वर्षाच्या तुलनेत 2020 मुंबईचा जन्मदर 20 टक्के घटल्याची नोंद करण्यात आली आहे. हा परिणाम कोरोनाव्हायरसचा (Covid-19) असल्याचे तज्ञांना सांगितले आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र (Maharashtra) देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य होते. त्याचवेळी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबईतील कोरोना संसर्गाची आकडेवारी झपाट्याने वाढली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी या घसरणीची अनेक संभाव्य कारणे सांगितली आहे. ते म्हणाले की, "साथीच्या काळात भविष्यातील सुरक्षिततेमुळे, सार्वजनिक रुग्णालयांचे कोविड-19 केंद्रांमध्ये रूपांतर, अनेकांनी फॅमिली प्लॅनिंग पुढे ढकलली असावी. त्याच वेळी, मुंबईतून मोठ्या संख्येने लोकांचे स्थलांतर हे देखील शहरातील जन्म दर कमी होण्याचे एक प्रमुख कारण असू शकते."

आकडेवारीनुसार अंदाजे 20 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये 2016 पासून दरवर्षी सरासरी 1.5 लाख बालकांचा जन्म झाला आहे. बीएमसीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2020 मध्ये कोविड साथीच्या रोगाची सुरुवात झाल्यापासून शहरात जन्मदरात घट झाली आहे. 2019 मध्ये मुंबईत 1 लाख 52 हजार 952 बालकांचा जन्म झाला . 2020 मध्ये हा आकडा 1 लाख 20 हजार 188 वर आला आहे. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये, 30 नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला तर एक तृतीयांश जन्म दर कमी होऊन तो 1 लाख 1 हजार 308 वर आला आहे.

<div class="paragraphs"><p>Covid 19 pandemic lower birth rate in Mumbai</p></div>
मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त 12 तासात; नितीन गडकरी

2011 च्या जनगणनेनुसार, शहरातील सुमारे 40 टक्के लोकसंख्या दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. जेव्हा महामारी सुरू झाली तेव्हा जी दक्षिण प्रभागातील वरळी कोळीवाडा, आणि उत्तर प्रभागातील धारावीचा समावेश कोविड हॉटस्पॉट बनलेल्या भागात करण्यात आला होता. यामध्ये काही ठिकाणे अशी होती, जिथे बहुतेक स्थलांतरित लोक राहत होते. पहिल्या लॉकडाऊननंतर गर्भवती महिलांसह लाखो स्थलांतरितांनी शहर सोडले. नागरी संस्थेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या सगळ्या घटनाक्रमामुळे देखील मुंबई मधला जन्मदर कमी होऊ शकतो.

<div class="paragraphs"><p>Covid 19 pandemic lower birth rate in Mumbai</p></div>
केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

अहवालानुसार, स्थानिक आरोग्य स्वयंसेवकांचे म्हणणे आहे की काही महिलांनी स्वतःला कोविड विषाणूपासून वाचवण्यासाठी बालकांना घरीच जन्म देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे काही बालकांच्या जन्मांची नोंद होऊ शकली नाही. विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. BMC डेटा नुसार 2019 मध्ये एकूण 353 होम डिलिव्हरी नोंदवण्यात आल्या होत्या, ज्यांची संख्या 2020 मध्ये 256 पर्यंत खाली आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com