मुंबई: मराठी लोकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे काँग्रेस नेते आलोक शर्मा अडचणीत सापडले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान, शर्मा यांनी मराठी लोकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन सुरु असलेल्या चर्चेत शर्मा सहभागी झाले होते. भाजपच्या दुसऱ्या नेत्या उत्तर देताना शर्मांची जीभ घसरली.
अलोक शर्मा यांनी मराठी लोकांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मिडियावर शर्मा यांच्या नेटकऱ्यांकडून निषेध केला जात आहे. भाजप आणि शिवसेनेने शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे तर केंद्रीय मंत्री पियुष गोएल यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
शिवसेनेने शर्मा यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांनी मराठी माणसाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
समाज माध्यमांवर आलोक शर्मांच्या वक्तव्यावरुन संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी शर्मांचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी मराठी लोकांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. तसेच, माफी मागण्याची मागणी केली आहे.
मराठी माणसाचा बलात्कारी असा उल्लेख करून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आलोक शर्मा यांनी तमाम मराठी माणसांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याच वक्तव्याचा निषेध नोंदवत शिवसेनेचे सोशल मीडिया राज्यप्रमुख आणि युवासेनेचे सरचिटणीस मा.श्री. राहुल कनाल यांनी मुंबई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार आलोक शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आलोक शर्मा यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही शिवसेनेतर्फे करण्यात आलीय.
काय म्हणाले होते आलोक शर्मा?
आलोक शर्मा यांनी बदलापूरच्या घटनेबबात एका हिंदी वृत्तवाहिनेवर सुरु असलेल्या चर्चेत सहभाग घेतला होता. याच चर्चेत भाजप नेतेही सहभागी झाले होते. आलोक शर्मा यांनी या चर्चेत बोलताना मराठी माणसाने अत्याचार केला असता तर त्याला माफ केले असते का? असा सवाल उपस्थित केला. यावरुन महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.