राज्यात याच महिन्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देष

30 नोव्हेंबरपर्यंत आपापल्या जिल्ह्यांमध्ये 100% लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत
Complete the 100 percent vaccination in Maharashtra state Chief Minister Uddhav Thackeray ordered  to DM
Complete the 100 percent vaccination in Maharashtra state Chief Minister Uddhav Thackeray ordered to DM Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) बुधवारी कोविड लसीकरण (Covid19 Vaccination) मोहिमेचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी ते देशातील साऱ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती . या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरण कार्यक्रमाला (Vaccination Program) गती देण्याचे आणि राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. म्हणजेच महिन्याच्या अखेरीस, महाराष्ट्रातील प्रत्येकाला लसीचा किमान एक डोस मिळाला पाहिजे . याशिवाय ज्यांनी लसीचा एक डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस वेळेवर घेण्याबाबत कोणतीही हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले आहे. (Complete the 100 percent vaccination in Maharashtra state Chief Minister Uddhav Thackeray ordered to DM)

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लाट अद्याप संपलेली नाही. पण ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे. कोरोना झाला तरी जीवाला धोका कमी असतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी न डगमगता लवकरात लवकर लस घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले आहे.

30 नोव्हेंबरपर्यंत आपापल्या जिल्ह्यांमध्ये 100% लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत . यासाठी सर्व स्तरावर जाऊन सर्व धर्म, जातीच्या लोकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यानी केले आहे . मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलावलेल्या या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील जालना येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील झाले.

Complete the 100 percent vaccination in Maharashtra state Chief Minister Uddhav Thackeray ordered  to DM
अनिल देशमुखांची दिवाळी ED कोठडीत,माजी गृहमंत्र्यांना कोठडीत असतील या मुभा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले की, सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी आहे. पण याचा अर्थ कोरोनाच्या चाचण्या कमी कराव्यात असा नाही. तसेच जनतेला कोरोना नियमांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेफिकीर राहू नका. असा इशारा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. चित्रपटगृहे सुरू होत आहेत. लसीशी संबंधित संदेश प्रत्येक सिनेमागृहात दाखवले जावेत. लसीकरणाच्या दोन्ही डोसची अटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर असलेल्या कामगारांसाठी अनिवार्य करा.लसीकरणासाठी दुर्गम भागात मोबाईल युनिट वापरा. दिवाळीनंतर विविध क्षेत्रांची आकडेवारी काढून त्यानुसार लसीकरणाचा वेग वाढवा आणि 100% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करा.असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com