Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: आज मराठा साम्राज्याचे संस्थापक वीर छत्रपती शिवाजी यांची जयंती आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. आज शिनवनेरी किल्यावर मोठा उत्साह बघायला मिळतो आहे. त्यांच्या वडिलांचे नाव शाहजी भोंसले, आईचे नाव जिजाबाई होते. शिवरायांच्या जीवनावर आई जिजाबाईंच्या मूल्यांचा तत्वांचा प्रभाव होता, त्यांच्या प्रेरणा आणि शिक्षणामुळे ते एक शूर, कार्यक्षम आणि हुशार शासक बनले. त्यांना स्वरांज्याची स्थापना केली.ते गनिमी कावा कलेमध्ये पारंगत होते. त्याच्या हुशारीवर आणि कुशल रणनीतीवर मुघलांचाही विश्वास होता. शिवाजी महाराजांना स्वतःच्या कतृत्वाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा पाया घातला होता. ते असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते, जे आजही सदैव आपल्या विचारांनी नवीन पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022)
मागील दोन वर्षापासुन शिवनेरी किल्ल्यावर मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थित शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यंदा कोरोना नियमांना शितीलता मिळाल्यानंतर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेले शिवनेरी येथे कोरोनामुळे मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. शिवजयंती साजरी करण्याच्या अनुशंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गृहविभागाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असली तरी कोरोना नियम-अटींचे पालन करावे लागणार आहे.
परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मसोहळा साजरा झाला.मात्र यंदाच्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला आहे. शिवनेरीवर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळणा जोजवला जातो. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर शिव जन्मसोहळ्याला उपस्थित होते.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यंदा पाळणा जोजवला आहे. यावेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे सुद्धा शिवजन्म सोहळ्यासाठी शिवनेरीवर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.