''देशात समान नागरी कायदा आणा'' : राज ठाकरे

ठाण्यातील सभेत राज ठाकरे कोणता संदेश मन सैनिकांना देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Raj Thackeray
Raj ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 2 एप्रिल गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यातच आज होत असलेल्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे मन सैनिकांना कोणता संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राज ठाकरे म्हणाले, ''भाषण करताना आज माझा टेबल फॅन होणार आहे. माझ्या गाडीच्या ताफ्याला कोणीतरी आडवणार आहे, ते महाराष्ट्रातील (Maharashtra) गुप्तचर यंत्रणेला समजलं, परंतु पवार साहेबांच्या घरावर कोणी हल्ला केला त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हतं का? गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून आज ठाण्यात जाहीर सभा घेत आहे.''

Raj Thackeray
मुंबै बँक प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रवीण दरेकरांना अटकेपासून दिलासा

राज ठाकरे पुढे म्हणाले, ''आजची सभा स्क्रीन लावून जम्मूमध्ये दाखवली जात आहे. अनेक पत्रकार राजकीय पक्षांचे मांडलिक बनले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक पत्रकार आपली स्वत:ची एक स्क्रीप्ट घेऊन आले होते. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी ज्या प्रकारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस कशाप्रकारे एकत्र आले त्यावर मी गुढीपाडव्याच्या वेळी बोललो होतो. मला कोणत्याही प्रकारचा ट्रॅक बदलण्याची गरज वाटत नाही. तसेच कोणत्याही नोटीसी येऊदे मग त्या राजकीय असो किंवा कायदेशीर मी त्यास भीक नाही घालत. ज्यावेळी मोदी सरकारने जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) संबंधातील कलम 370 रद्द केलं त्यावेळी ट्वीट करणारा पहिला व्यक्ती मी होतो. देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण करणारा कायदा आणा अशी मी मागणी मोदी सरकारकडे करतोय.''

Raj Thackeray
नारायण राणेंना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

राज ठाकरे पुढे म्हणाले, ''अजित पवारांच्या घरावर ईडीची धाड पडते मग सुप्रिया सुळे यांच्यावर का पडत नाही. पवार साहेब खूश झाले तर राजकीय नेत्यांना भिती वाटायला लागते. आता पवारसाहेब संजय राऊतांवर खूश आहेत. मी कधीही पवारसाहेबांना भडकताना पाहिलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं होतं की, तुम्ही पंतप्रधान झाले की, उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड सारख्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना आवरा. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा निवडून येणाऱ्या आमदारांची मोळी आहे, आणि पवारसाहेब त्या मोळीची रस्सी आहेत एवढचं. मशीदीवरील भोग्यांचा देशाला त्रास होतोय. याआगोदरही यासंबंधी मी बोललो होतो. त्यांना सांगून जरी जमत नसले तर त्यांच्या मशीदीसमोर स्पीकर लावून आम्ही हनुमान चालीसाचं पठन करु. या मागणीवरुन आम्ही मागे हटणार नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com