Aurangabad News: स्वत:ला पेटवून प्रेयसीला मारली मिठी, मराठवाडा विद्यापीठ परिसरातील धक्कादायक घटना

दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Aurangabad News
Aurangabad NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Aurangabad News: प्रियकराने स्वत: ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Aurangabad News
What Is A Narco Test: आफताबची नार्को टेस्ट कधी? नार्को टेस्ट म्हणजे काय व कशी केली जाते?

मराठवाडा विद्यापीठात झुलॉजी विभागातील गजानन मुंडे आणि पूजा साळवे हे दोघेही संशोधक विद्यार्थी आहेत. दोघेही शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था कॉलेजमध्ये आले होते, त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रियकर गजानन मुंडे याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेत, प्रेयसीला मिठी मारली. या घटनेमध्ये दोघे गंभीररित्या गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mhadei Wildlife Sanctuary Tiger Deaths
Curchorem Crime Case
Drowning Incident
Software Engineer Couple Death Bengaluru
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com