महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाईट अवस्था; 50 पैसे प्रतिकिलो कांदा

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात
Onion Market
Onion MarketDainik Gomantak
Published on
Updated on

भारत सरकारने जवळपास दोन दशकांपूर्वी 50 पैशांची नाणी काढणे बंद केले होते. तेव्हापासून देशभरातील बाजारात 50 पैशाचे मूल्य संपले आहे. त्यामूळे 50 पैशांना बाजारात उपलब्ध असलेली उत्पादनेही गेल्या अनेक वर्षांपासून किमान 1 रुपयाला उपलब्ध होत आहेत.हे खरे असले तरी देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते. असे असले तरी महाराष्ट्रातील मंडईत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी ही 50 पैसे ते 75 पैसे प्रतिकिलो अशी केली जात आहे. जे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. कांद्याचा हा भाव आतापर्यंतचा सर्वात नीचांक आहे. (Bad condition of onion growers in Maharashtra )

Onion Market
कोर्टाने सुद्धा घटनेचा अपमान करायचं ठरवल्याचं दिसतंय - प्रकाश आंबेडकर

50 पैसे प्रतिकिलो दराने कांद्याचा व्यापार

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील येवला मंडईत 20 मे रोजी कांद्याचा किमान भाव 50 पैसे प्रतिकिलो आहे. दुसरीकडे, राज्यातीत सटाणात शेतकऱ्यांकडून 75 पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्यात आला आहे. नाशिक हा देशातील सर्वात प्रसिद्ध कांदा उत्पादन जिल्हा आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, कांदा भाव वाढतात तेव्हा सरकार कांदा आयात केला. त्यामुळे भाव पुन्हा घसरले. आता शेतकऱ्यांना एवढा कमी भावाने नुकसान भरपाई देण्याची गरज आहे, अशी मागणी दिघोले यांनी केली

Onion Market
अरबी समुद्रात मोसमी पाऊस दाखल; अनेक भागात पूर्व मोसमी पावसाची बरसात सुरू

ते बाजारात आणण्याची मालवाहतूक खर्च ही निघत नाही

कांद्याच्या घसरत्या भावाबाबत येवला तालुक्यात राहणारे शेतकऱ्याने सांगितले की, यावर्षी त्यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा लागवड केली होती, पण अशी परिस्थिती होईल याचा विचारही केला नव्हता. एवढ्या कमी दराने कांदा विकण्यापेक्षा तो फेकून दिलेला बरा

कांदा दरात घसरण सुरूच

सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. राज्यातील इतर मंडईतही भाव 1 रुपये किलोपर्यंत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आता फुकटात कांदा वाटप करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामूळे दिवस रात्र एक करुन पिकवलेला कांदा कवडी भावाने विकताना शेतकऱ्यांचे काय होत असेल याबाद्दल शासनकर्त्यांनी विचार करणे क्रमप्राप्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com