महाराष्ट्रात मनसे - भाजप युतीचा प्रस्ताव ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका
Chandrkant patil
Chandrkant patilDainik gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढी पाढव्याच्या मूहूर्तावर घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी बदललेल्या भुमिकांमूळे राज्यातील राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. राज ठाकरे केंद्र शासनाचे समर्थन करतात अशा आशयाच्या चर्चा सुरू होत्या. कारण या मेळाव्याला संबोधीत करताना देशातील महागाई, अथवा वाढत असलेले इंधनाचे दर यावर काहीही भाष्य न करता राज ठाकरे यांनी राज्य शासनाच्या धोरणांवर टीका केली होती.( bjp leader Chandrakant Patil commented on possible alliance with mns in maharashtra )

Chandrkant patil
भोंग्याच्या वादात नागपुरातील मशिदीने दाखवले सामंजस्य, कमी आवाजात केले अजान

या मेळाव्यात भाषणामधून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातल्यानंतर या दोन्ही विषयांसंदर्भात भारतीय जनता पार्टी आणि मनसेची भूमिका सारखी असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरुन आता मनसेसोबत भाजपा युती करणार का ? या चर्चांना राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलंय. असं असतानाच मनसेसोबतच्या युतीबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी मनसेसोबत सध्या युती नाही असे म्हटले आहे.

Chandrkant patil
Sammruddhi Mahamarg: उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

राज ठाकरे भविष्यातील मित्र असतील मात्र आता युतीची काही शक्यता नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणी घेईल म्हणजेच मनसे सोबतच्या युतीचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या मनसेसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना, “भाजपा कुठल्याही पक्षाला बरोबर घेताना राज्याची आमची कोअर कमिटी निर्णय घेते.

खास करुन मनसेसारखा निर्णय तर आमचा केंद्रात होईल,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “मनसेची अमराठीसंदर्भातील जी भूमिका आहे. त्याच्यामध्ये आम्हाला केंद्रानेच विचार करावा लागेल.आज तरी मनसेसोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमचा नाही,” असंही भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com