Maharashtra: रस्त्यावरील खड्ड्यात पडून दुचाकीस्वार पती-पत्नीचा मृत्यू

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे.
 Accident News
Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Road Accident: राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत एक अतिशय वेदनादायक अपघात घडला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नॅशनल पार्क ब्रिजवर खड्ड्यात पडून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. मागून येणाऱ्या डंपरने त्यांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.

 Accident News
Train Accident: गोंदियामध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 50 हून अधिक प्रवाशी जखमी

अलिकडच्या काळात ठाणे, भिवंडी आणि कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे 5 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोकांना जीवही गमवावा लागत आहे. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या दोन वर्षात मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती. मुंबईतील अतिरिक्त काँक्रीट रस्त्यांसाठी सात हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे शिंदे म्हणाले होते. गरज भासल्यास आणखी निधी वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

 Accident News
DA Hike in Maharashtra: सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 3 टक्क्यांनी वाढ

गेल्या महिन्यात अवमान याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेसह महाराष्ट्रातील नागरी संस्थांना फटकारले होते. न्यायमूर्ती ए के मेनन आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती न करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना नागरी संस्थांवर भाष्य केले होते. सर्व मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. तसेच खराब रस्ते आणि खड्डे यांच्याबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एकसमान यंत्रणा तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com