बीडच्या कंत्राटदाराचा कोल्हापुरात खून, शीर बंधाऱ्यात तर धड नदीत

लव्हुरी गावातून एका कंत्राटदाराचे अपहरण करून खून करण्यात आला.
Beed contractor killed in Kolhapur
Beed contractor killed in Kolhapur Dainik Gomantak
Published on
Updated on

बीड जिल्ह्यातील लव्हुरी गावातून एका कंत्राटदाराचे अपहरण करून खून करण्यात आला आहे. लव्हुरी येथून अपहरण करून सुधाकर हनुमंत चाळक (वय 55) याचा कोल्हापुरात खून झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मृताचे शीर निलजी बंधाऱ्यात टाकल्याचे संशयितांनी सांगितले त्यानंतर आज या प्रकरणाचा शोध घेण्यात आला. मात्र शीर अद्याप सापडले नाही. दरम्यान, हेब्बाळच्या नाल्यात सत्तूर सापडल्याचे केजचे पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी माध्यमांना सांगितले. खुनाच्या तपासासाठी केज पोलिसांचे पथक सलग दुसऱ्या दिवशीही गडहिंग्लज तालुक्यात ठाण मांडून बसले होते. (Beed contractor killed in Kolhapur)

केश्‍वरजवळील नांगनूर बंधाऱ्यात मृतदेह

या खूनप्रकरणी केज पोलिसांनी दत्तात्रय हिंदूराव देसाई (58, कडगाव, ता. भुदरगड), तुकाराम मुंढे (53, चारदरी, ता. धारूर, जि. बीड) व रमेश मुंढे (45, पोटबन, ता. वडवणी, जि. बीड) या आरोपींना अटक केली आहे. चाळक लव्हुरीतून काही महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता. दरम्यान, ऊस तोड मजुरासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारातून चाळक यांचा घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटूंबियांना आल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली. मुंढे व देसाई याची नावे पुढे आल्याने त्या दोघांनाही त्याब्यात घेण्यात आले आहे. संकेश्‍वरजवळील नांगनूर बंधाऱ्यात चाळकचा मृतदेह टाकल्याची संशयितांनी कबुली देऊन त्यांनी स्वत: जागाही दाखविली.

Beed contractor killed in Kolhapur
दहावीत शिकणाऱ्या मुलीवर चाकू हल्ला; मुलीची प्रकृती गंभीर

हेब्बाळ गावाजवळचा नाल्यात हत्यार

या तपासानंतर राबवलेल्या शोधमोहिमेत चाळक यांचा मृतदेह काल बंधाऱ्यात आढळला. आणि त्यांचे शीर निलजी बंधाऱ्यात टाकल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितल्यानंतर केज पोलिस पथकाने शोध मोहिम धडाक्यात सुरू केली. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी कोल्हापूरहून पाण्यातील कॅमेरे आणि स्कूबा डायव्हींगच्या लोकांना बोलावण्यात आले.परंतु सायंकाळी सातपर्यंत मृताचे शीर सापडले नव्हते. या दरम्यान हिरण्यकेशी नदीपात्रात पाणी भरपूर असल्याने शोधमोहिमेत निर्माण होत असल्याचे पोलिसांनी सांगतिले. तपासाला गती येत असतान सकाळच्या सत्रात खुनासाठी वापरलेल्या हत्याराची चौकशी करण्यात आली. खुन करण्यासाठी वापरण्यात आलेले अवजार हेब्बाळ गावाजवळचा नाल्यात टाकले असल्याचे संशयीतांनी सांगितले. त्याठिकाणी शोध घेतला असता हत्यार मिळाल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले.

Beed contractor killed in Kolhapur
Shakti Act in Maharashtra: महाराष्ट्रात 'शक्ती कायदा' लागू होणार

दगड अन् तारेचा वापर

चाळकचा मृतदेह पाण्यात टाकल्यानंतर तो वर येऊ नये यासाठी संशयीतांनी मृत चाळकचे पाय दुमडून दोन्ही पायाच्या मध्ये 25 किलोचा दगड बांधला आणि त्यासाठी त्यानी तारेचा वापर केला. संपूर्ण धडाला 40 ते 45 किलो वजनाचा दगड बांधल्याने चाळक यांचा मृतदेह खोल पाण्यात गेला होता. शेवची पोलिसांनी रावबलेल्या शोध मोहिमेला यश आले आणि हा मृतदेह नांगनूर बंधाऱ्यातून गडहिंग्लजच्या पास रेस्क्यू टीमने बाहेर काढला. आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयात चाळक यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com