Tourist Vehicle Sticker: पर्यटकांची सतावणूक रोखण्यासाठी ‘स्टिकर’

‘टीटीएजी’कडून स्वागत : पोलिसांकडून नाहक अडवणुकीचे प्रकार घटणार
 Traffic Police
Traffic Police Gomantak Digital Team
Published on
Updated on

CM Pramod Sawant on Tourist Vehicle Sticker: रस्ता मार्गे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची तपासणी सीमेवरील नाक्यावर केल्यावर त्या वाहनाला खास स्टिकर लावण्याची पद्धत सुरू करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.

पर्यटकांची सतावणूक रोखण्यासाठी ही स्वागतार्ह बाब असल्याचे मत आदरातिथ्य व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या ‘टीटीएजी’चे अध्यक्ष नीलेश शहा यांनी व्यक्त केली आहे.

(CM Pramod Sawant says Tourist vehicles to be given unique stickers to avoid harassment)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी ही घोषणा केली होती. पर्यटकांच्या वाहनांना हे स्टिकर लावल्यावर त्यांची राज्यात अन्य ठिकाणी कुठेही तपासणी केली जाणार नाही.

यासंबंधी शहा म्हणाले की, स्वतःचे वाहन घेऊन गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कित्येक वेळा पुन्हा पुन्हा तपासणीला सामोरे जाऊन जी सतावणूक होत होती, त्यावर अंकुश बसणार आहे. ही आमची कित्येक वर्षांपासूनची मागणी होती.

वाहतूक व्यवस्थेत बदल हवा

सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सुधारण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यासाठी ३१.९२ कोटींची तरतूद केली, ही चांगली बाब असून राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारल्यास पर्यटकांना टॅक्सी व अन्य सेवांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी ''होम स्टे'' योजना सुरू केली आहे, तिचाही पर्यटन विस्ताराला फायदा होईल, असे शहा म्हणाले.

 Traffic Police
Oats Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ओट्स डोसा

मनोरंजन धोरण फायदेशीर

बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारने ‘मनोरंजन धोरण’ आखण्याची जी घोषणा केली आहे, ती चांगली बाब असून हे धोरण कसे राबविणार, याची पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना उत्सुकता आहे.

चांदर गावाला वारसा गावाचा दर्जा देऊन या भागात पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच प्रयत्न इतर गावांसाठीही केले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 Traffic Police
IPL 2023: उत्सुकता शिगेला! सर्व 10 संघांचे कर्णधार अन् खेळाडू, जाणून घ्या एका क्लिकवर

यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यटनाशी संबंधित बाबींवर कुठलेही नवीन कर वाढविलेले नाहीत, ही समाधानाची बाब आहे. महागड्या मद्यावरील अबकारी करात कपात करण्याची जी तरतूद केली आहे, तीही पर्यटन व्यवसायासाठी फायद्याची ठरेल.

नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com