'सोमवारपर्यंत कामावर या अन्यथा... एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परबांचे आवाहन

आत्तापर्यंत दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
Anil Parab
Anil ParabDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. मात्र हा अजूनही संप संपलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंबंधी जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले तेव्हा त्यावर समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहावालानुसारच राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र विलीनीकरणाच्या व्यतरिक्त जे काही मुद्दे असतील त्या मुद्यावर योग्य तो निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल असही राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले, आत्तापर्यंत दहा हजार एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. विलीनीकरणाच्या मुद्दयावर न्यायालयाच्या निर्णयाशिवाय पुढे जाता येणार नाही. त्याचबरोबर विलीनीकरणाच्या निर्णयावर सरकार कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर परततील त्यांना परत नव्याने सेवेत घेऊ. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे.

आतापर्यंत 9 हजार 625 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे

MSRTC च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की संपात सहभागी झालेल्या 9,625 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे, तर 1,990 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सद्यस्थितीत 67 आगारांतून बसेस सुरू असून शनिवारी महामंडळाने 1,564 बससेवा चालविल्याचा दावा महामंडळाने केला आहे.

शुक्रवारी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले होते की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com