अनिल देशमुखांची तब्येत बिघडली; ICU मध्ये केले दाखल

100 कोटी वसुली आरोपाखाली सोडावे लागले होते गृहमंत्री पद
Anil Deshmukh
Anil DeshmukhDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना छातीत दुखू लागल्यामुळे केईएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्यांचा रक्तदाब वाढला असून त्यांची लवकरच वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सद्या ते 100 कोटी वसूली प्रकरणात सीबीआय कोठडीत आहेत. (Anil Deshmukh's health deteriorates; Admitted to ICU )

Anil Deshmukh
समीर वानखेडे यांच्यावर होणार कठोर कारवाई

नोहेंबर 2021 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सीबीआयने देशमुख यांना अटक केली होती. तर आपल्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली होती. यावेळी त्यांनी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मागितली होती. परंतु न्यायालयाने त्यांना शहरातील जेजे रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश दिले होते.

100 कोटी वसुली आरोपाखाली सोडावे लागले होते गृहमंत्री पद

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. सध्या देशमुख आणि वाझे दोघेही कोठडीत असून चांदीवाल समितीकडून दोघांचीही चौकशी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआयनेही चौकशी केली आहे.

वाझे याने याबाबत तपास यंत्रणांकडे अर्ज केला होता. या प्रकरणासंदर्भातील मला ज्ञात असलेली संपूर्ण वस्तुस्थिती सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास तयार आहे. CRPC कलम 306 , 307 नुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घेण्याची मी तुम्हाला विनंती करतो, असे सचिन वाझेने पत्रात म्हटले होते. त्याला देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता.

यापूर्वी चांदीवाल समितीसमोर सचिन वाझेने आपली साक्ष फिरवण्यासाठी अर्ज केला होता. यामध्ये देशमुखांनी मला वसुलीचे आदेश दिले होते आणि वसूल केलेले पैसे त्यांच्या लोकांना दिले, असा आरोप वाझेने केला होता. मात्र, समितीने तो फेटाळून लावला होता. चांदीवाल समितीसमोर सचिन वाझेने उलटतपासणीत, अनिल देशमुख यांनी त्याला बार आणि आस्थापणाकडून वसुलीचे आदेश दिले नसल्याचे सांगितले होते. पण आपण दबावापोटी देशमुखांच्या बाजूने साक्ष दिल्याचे वाझेने आयोगासमोर दिलेल्या पत्रात म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com