समीर वानखेडे यांच्यावर होणार कठोर कारवाई

कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला दिलासा
Sameer Wankhede, Aryan Khan
Sameer Wankhede, Aryan KhanDainikGomantak

आर्यन खानला गेल्या वर्षी कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने छापेमारी करत अटक केली होती. यावेळी आर्यन खानसह इतर काही जणांनाही अटक झाली होती. त्यांच्याकडे ड्रग्ज सापडल्याचा दावा NCB ने केला होता. या खटल्यात आर्यन खानला क्रूझ ड्रग्स प्रकरणात NCB च्या आरोपपत्रात क्लीन चिट मिळाल्याने. या प्रकरणात आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. (Sameer Wankhede will be severely punished )

Sameer Wankhede, Aryan Khan
Aryan Khan Case: आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने सक्षम अधिकाऱ्याला वानखेडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. तेसच आर्यन खान ड्रग्ज जप्ती प्रकरणात NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर ढिसाळ तपासणीचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे.समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकार आधीच कारवाईच्या पवित्र्यात आहे. यातच NCB ने शुक्रवारी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट दिली.

या प्रकरणी केवळ 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, पुराव्याअभावी आर्यनसह 6 जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यामूळे आर्यन खानला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. तर समिर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

''समीर वानखेडेच्या टीमने चूक केली''

एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, आर्यन खान ड्रग प्रकरणात समीर वानखेडेच्या टीमने चूक केली. अटकेवेळी समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास करत होते. प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, जर एनसीबीने चूक केली नसती तर एसआयटीने तपास स्वतःच्या हातात का घेतला असता. तसेच याप्रकरणी एनसीबीच्या दक्षता पथकाचा अहवालही लवकरच येऊ शकतो, त्यानंतर समीर वानखेडेचा त्रास वाढू शकतो.

Sameer Wankhede, Aryan Khan
महाराष्ट्रात लवकरच बरसणार सरी, दिल्लीचा वाढणार पारा

काय आहे आर्यन खानला पार्टी प्रकरण ?

आर्यन खानला गेल्या वर्षी कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने छापेमारीदरम्यान अटक केली होती. आर्यन खानसह इतर काही जणांनाही अटक झाली होती. त्यांच्याकडे ड्रग्ज सापडल्याचा दावा करण्यात आला होता. काही आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खान याला जामिनावर सोडण्यात आले होते.

दरम्यान, कोर्टाने दिलेला ६० दिवसांचा अवधी संपल्यानंतर एनसीबीने विशेष कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला आरोपी करण्यात आले नाही. आर्यन आणि मोहक यांच्याकडे ड्रग्ज आढळले नाहीत. इतर सर्व आरोपींकडे ड्रग्ज सापडले आहेत. एनसीबीच्या माहितीनुसार, इतर १४ आरोपींविरोधात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आर्यन खानसह ६ जणांविरोधात सबळ पुराव्यांअभावी तक्रार दाखल करण्यात येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com