सर्व अपक्ष आमदारांना एकत्र येत विचार करावा लागेल - आमदार देवेंद्र भुयार

अपक्ष आमदार एकत्र येत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत ?
Devendra Mahadevrao Bhuyar
Devendra Mahadevrao BhuyarDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील राजकारण नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप - प्रत्यारोपाच्या फैरींनी पार ढवळून निघाले आहे. निवडणुकीपुर्वी आपला उमेदवार निवडूण येणार म्हणत विजयाच्या आरोळ्या ठोकणारे नेते आता जय - पराजयाच्या घडामोडींनी एकमेकांवर राळ फेकण्यात व्यस्त आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पराभव विचार करण्या ऐवजी या पराभवाचे खापर सरळ अपक्ष आमदारांवर फोडले आहे. (All independent MLAs have to come together and think - MLA Devendra Bhuyar )

राज्यसभा निवडणुक निकालानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर गंभीर आरोप केला आणि भाजपला मतदान करणाऱ्या अपक्षांची थेट नावेच जाहीर केली. मात्र, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे अपक्ष आमदार नाराज झाले आहेत. संजय राऊत यांनी ज्या अपक्ष आमदारांची नावे घेतली त्यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचंही नाव आहे. देवेंद्र भुयार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला सुद्धा निघाले आहेत.

Devendra Mahadevrao Bhuyar
दक्षिण कोकणसह गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

भुयार म्हणाले की आता आम्हाला सर्व अपक्ष आमदारांना एकत्र येऊन विचार करावा लागेल. हा केवळ माझ्या एकट्यावर नाही तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे. तसेच ते म्हणाले की मी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत निवडून आलो आहे.

लोकसभा निवडणुकीपासून मी आघाडीसोबत आहे. संजय राऊत यांचा पक्ष आत्ता आघाडीसोबत आला. मी कायम शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत आहे. गद्दारी करायची असती तर यापूर्वीच केली असती पण मतदान करुनही असे बोलत असतील तर संजय राऊत यांचं कुटंतरी चुकत आहे. आमच्याबद्दल अशा प्रकारचं अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com