महाराष्ट्रात अनेक ठीकाणी दमदार नसली तरी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामूळे शेतकरी वर्गात काहीसं आनंदाचं वातावरण आहे. कारण या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना आता वेग येणार आहे. तसेच धुळपेरणी केलेल्या पिकांना ही या पावसाने चांगली उगवण होण्यास मदत होणार आहे. तर हवामान विभागानं पुढील पाच दिवसात राज्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुढच्या 24 तासात कोकणात मुसळधार पावसाचा ही अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Heavy rain expected in many places in Goa including South Konkan)
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासात दक्षिण कोकणसह गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे, तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं सांगितला. तसेच विदर्भातही काही ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रातील विविध भागात आगेकूच करण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शुक्रवारी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूननं रायगडसह पुण्यापर्यंतचा भाग व्यापला आहे. काल कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाऊस झाला.
पालघर, मुंबई, कोल्हापूर या भागात पाऊस झाला आहे. मोसमी पाऊस दाखल झाल्यानं कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरित सर्व महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.