Maharashtra: अकोल्यात दोन गटांत तुफान राडा; कलम 144 लागू

या घटनेची माहिती देताना अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा म्हणाल्या की, दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
Maharashtra
MaharashtraDainik Gomantak

Maharashtra: महाराष्ट्रातील जुन्या अकोला शहरात दोन गटांमध्ये वाद झाला. मात्र या किरकोळ वादातून परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचाराचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन गटातील लोक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. यासोबतच ते वाहनांची तोडफोड करून गोंधळ घालत आहेत. दुसरीकडे परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

शहरात कलम 144 लागू

या घटनेची माहिती देताना अकोल्याच्या जिल्हाधिकारी नीमा अरोरा म्हणाल्या की, दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसक जमावाने काही वाहनांची तोडफोड केली. 

यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसरीकडे किरकोळ वादातून हाणामारी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या हाणामारीनंतर जुने शहर पोलीस ठाण्यातही मोठा जमाव जमला होता. 

Maharashtra
Unique Wedding: अनोख्या लग्नाची अनोखी पंगत, पाहुण्यांसोबत जेवल्या गायी, कुत्री, मुंग्या!

एसपी संदीप घुगे म्हणाले - परिस्थिती नियंत्रणात आहे

दुसरीकडे, अकोला एसपी संदीप घुगे यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या आदेशानंतर संपूर्ण अकोला शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. अकोला येथे अलीकडच्या काळात ही दुसरी मोठी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अकोट फाईल परिसरातील शंकर नगर परिसरातून हिंसक हाणामारी झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com