शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण करावेत: Ajit Pawar

राज्यामधील शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात कोरोनाचा (Covid 19) संसर्ग कमी झाल्याने 1 सप्टेंबरपासून दिल्ली (Delhi) केंद्रशासित प्रदेशासह राजस्थानानमध्ये (Rajasthan) पुन्हा शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये शाळा कधी सुरु होणार याकडे मात्र शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ठाकरे सरकारने राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र राज्यातील शिक्षक आणि शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीचे डोस पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Ajit Pawar
तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज, नीती आयोगाचे ते पत्र जुनेच: राजेश टोपे

दरम्यान, आपला ज्या मुलगा शाळेत जातोय तेथील शिक्षकांचे लसीचे दोन डोस झाल्यानंतर पालकांना दिलासा मिळेल असेही यावेळी अजित पवार म्हणाले. राज्यामधील शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र मोदी सरकारकडून मोठे गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. शिवाय कोरोनाच्या पाश्वभूमीवर बऱ्याच राज्यांमध्ये शाळा सुरुही करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरु करताच विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळमध्ये (Kerala) सापडले असल्याची नोंद झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा (Maharashtra) क्रमांक लागतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना दिल्या असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar
सार्वजनिक-खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

शिवाय, राज्यात कोरोनाची परिस्थिती सध्या आटोक्यात आली असली तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे. तसेच लहान मुलांचं लसीकरण करण्यात आले नसल्याने तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने शाळा सुरु झाल्यास पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणासाठी पात्र असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं प्राधान्यांनं कोरोना लसीकरण करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी देखील राज्यांना शिक्षकांचं लसीकरण युध्दपातळीवर करण्याचे आदेश दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com