अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात

जितेंद्र आव्हाड यांनी केलं मुंबई पोलिसांचं अभिनंदन
Sharad Pawar,  Ketaki Chitale , Jitendra Awhad
Sharad Pawar, Ketaki Chitale , Jitendra AwhadDainik Gomantak

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असणारी पोस्ट केली होती. या प्रकरणी तिच्यावर कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीला विचार करुन बोलत चला असं ही म्हटले होते.

यानंतर केतकी चितळेच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण शरद पवार प्रकरणावरुन पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं आहे.या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिर्याद दाखल करत ठाणे पोलिसांनी केतकी चितळे विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे.

Sharad Pawar,  Ketaki Chitale , Jitendra Awhad
केतकी चितळेच्या पोस्टवरुन जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले...

पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. या अटकेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. तसेच या कारवाईबद्दल ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं आहे.

Sharad Pawar,  Ketaki Chitale , Jitendra Awhad
केतकी चितळेला अटक करताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

काय म्हणाली होती केतकी चितळे शरद पवार यांच्याबद्दल

तुका म्हणे पवारा। नको उडवू तोंडाचा फवारा ॥

ऐंशी झाले आता उरक वाट पहातो नरक ॥

सगळे पडले उरले सुळे सतरा वेळा लाळ गळे ॥

समर्थांचे काढतो माप। ते तर तुझ्या बापाचेही बाप ॥

ब्राह्मणांचा तुला मत्सर । कोणरे तू ? तू तर मच्छर ॥

भरला तुझा पापघडा । गप नाही तर होईल राडा ॥

खाऊन फुकटचं घबाड । वाकडं झालं तुझं थोबाड ॥

याला ओरबाड त्याला ओरबाड तू तर लबाडांचा लबाड ॥

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com