महाराष्ट्र सरकारच्या कुटुंब नियोजन योजनेला आशा वर्कर्सचा विरोध

आशा वर्कर खेड्यापाड्यात सेक्स सिम्युलेशन उपकरणे कशी समजावून सांगायची याच प्रश्नाने गोंधळात पडल्या आहेत.
Accredited Social Health Activist
Accredited Social Health Activist Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत, राज्यातील ठाकरे सरकारने (State Government) कुटुंब नियोजन किटसह रबर डिल्डोचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे 'रबर पेनिस' देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आशा वर्कर्सनी विरोध दर्शवला आहे. खरं तर, आशा वर्कर खेड्यापाड्यात सेक्स सिम्युलेशन उपकरणे कशी समजावून सांगायची याच प्रश्नाने गोंधळात पडल्या आहेत. (Accredited Social Health Activist workers oppose Maharashtra governments family planning scheme)

Accredited Social Health Activist
पंतप्रधान मोदी फक्त दोन तास झोपतात: चंद्रकांत पाटील

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमा अंतर्गत जनजागृती करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. कुटुंब नियोजन किटमध्ये जेव्हा आशा वर्कर्सना डिल्डो देण्यात आला होता तेव्हा ते पाहून त्यांना धक्काच बसला असल्याचे सांगण्यात आले. विभागाच्या अधिकाऱ्यांनी आशा कार्यकर्त्यांना किटचा डेमो देण्यास सांगितले होते मात्र, राज्य सरकारकडून (State Government) अजूनही डिल्डोबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.

कुटुंब नियोजन किटमध्ये डिल्डोचा समावेश करण्याबाबत राज्यभरातील आशा वर्कर्स विरोध दर्शवत आहेत. काहींना आशा वर्कर्सना तर त्याची माहितीही नाहीये. अशा स्थितीत त्याचा डेमो गावोगावी देणे म्हणजे त्यांच्यासाठी आव्हानात्मकच बनले आहे. राज्यातील महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या तबस्सुम हुसैन या कार्यकर्त्याने या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध दर्शवला आहे आणि ते लाजिरवाणे आणि लज्जास्पद असल्याचे यावेळी म्हटले आहे.

Accredited Social Health Activist
पुण्यात नातेसंबंधांवर भारी पडले वासनाकांड

आशा कामगार ह्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भारताचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणून स्थापन केलेल्या मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समुदायाचा एक भाग आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने (Chief Minister Uddhav Thackeray) कुटुंब कल्याण किटमध्ये डिल्डोचा समावेश केल्याची बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत, काहींनी त्याची खिल्ली उडवली तर काहींनी याला क्रांतिकारी पाऊलच म्हटले. त्याच वेळी, काही लोक आहेत जे आशा वर्कर्सबद्दल सहानुभूतीची भावना दर्शविताना दिसत आहेत.

काही नेटिझन्सना तर स्वरा भास्करच्या 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटातील वादग्रस्त 'व्हायब्रेटर'चीच आठवण झाली. या निमित्ताने सिल्व्हर स्क्रीनवर डिल्डोची वकिली करणाऱ्या स्वरा भास्करची लोकांनी त्याबद्दल समाचार घेतला.

Accredited Social Health Activist
धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर तो सुपर होईल!

या धाडसी हालचालींमुळे इंटरनेट वापरकर्त्यांना मोशन पिक्चर्समध्ये डिल्डो वापरणाऱ्या अभिनेत्रींची आठवण करून दिली, तर वास्तविक जीवनातील आशा वर्कर्सना लोकसंख्या नियंत्रण उपाय म्हणून डिल्डोबद्दल जागरूकता पसरवण्याचे मोठे आव्हानच दिेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com