ED
EDDainik Gomantak

Patra Chawl Case : पत्राचाळ प्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील कोट्यावधींची मालमत्ता ED कडून जप्त

गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थनगर) पुनर्विकास प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती
Published on

Patra Chawl Case : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात तुरुंगवास भोगला होता. तेच पत्राचाळ प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याप्रकरणी ईडीने गोव्यात कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात खासदार राऊत यांनी 102 दिवस आर्थर रोड कारागृहात तुरुंगवास भोगला होता. यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

ED
Virdi Dam Dispute : विर्डी धरणाचे काम तात्काळ थांबवा; गोवा सरकारची महाराष्ट्राला नोटीस

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन संचालकांची संपत्ती जप्त केली आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणातील गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे उत्तर गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. यांच्या 31.50 कोटी रुपयांच्या दोन स्थावर मालमत्ता अर्थात इमारती ईडीनं जप्त केल्या आहेत.

गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थनगर) पुनर्विकास प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. 102 दिवस आर्थर रोड कारागृहात तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजुर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com