एक सामान्य युवक ते पाच वेळा विधानसभा सदस्य हा अचंबित करणारा प्रवास करणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांची अचानक झालेली एक्झीट अन् अपघातानंतर एक तास कोणत्या ही वाटसरुने न केलेली मदत, यातच त्यांचा मृत्यू झाला. याला काही तास झाले आहेत. मेटे यांच्यावर अद्याप अंत्यविधी होणे बाकी आहे. तोपर्यंच त्यांच्या मृत्यूवरुन शंका व्यक्त केली जात आहे.
(Accidental death of Vinayak Mete Maratha leader Doubt is being expressed from this)
हा गौप्यस्फोट मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी केला असून त्यांनी ऐनवेळी बदललेल्या नियोजनावरुन शंका व्यक्त केली आहे. पाटील म्हणाले की, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे रात्रीच बीडवरून मुंबईसाठी निघाले होते. शनिवारी त्यांना मंत्रालयातून दोनदा फोन आले होते.
सुरुवातीला रविवारी दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती. सायंकाळी सात वाजता त्यांना फोन करून तातडीने मुंबईला या, बैठक 12 वाजता होणार आहे, असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी केला आहे. मेटे यांनी दोन्ही फोन आलेले तेव्हा मी बीडमध्ये आहे, एवढ्या तातडीने मुंबईला कसा पोहोचेन असे त्या फोनवर पलिकडील व्यक्तीला कळविले होते. परंतू, त्यांच्यावर मुंबईला तातडीने येण्यासाठी दबाव कोणी टाकला, याची चौकशी झाली पाहिजे असे पाटील म्हणाले.
मेटे रात्रीच मुंबईला जाण्यासाठी निघाले. ही वेळ कोणी बदलली असा सवाल त्यांनी केला आहे. याचबरोबर शिवसेनेने देखील मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे. शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा मेटे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मेटे यांना कोणी फोन करून बोलावले, याची चौकशी व्हावी असे अरविंद सावंत यांनी ही म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.