आजपर्यंत आपण महिला हनी ट्रॅपच्या आधारे पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची उदाहरणे पाहिली असतील. मात्र नवऱ्याशी घटस्फोट घेत तुझ्याशी लग्न करेन मात्र त्या आधी मला ही पायलट व्हायंच आहे. त्यासाठी मला अर्थिक मदत कर असे सांगत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील एका पायलटला नोएडा येथील महिलेने लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (A woman from Noida cheated a Sangli pilot of Rs 59 lakh )
या महिलेने तक्रारदार असणाऱ्या आतिष शिंगे यांना सुमारे 59 लाखाला गंडा घातला असल्याचा प्रकार समोर आला आहे. नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचन देत नोएडाच्या हना खान या महिलेने मिरजेतील पायलटला हा गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येताच पैसे परत मागितले असता आईकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी ही या महिलेने दिल्याचे तक्रारदार शिंगे यांनी सांगितले. याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आतिष शिंगे हे पायलट आहेत. त्यांचा उत्तर प्रदेशातील हना खान हिच्याशी परिचय झाला. “माझं लग्न झालेलं आहे. त्यामुळे मी पतीशी घटस्फोट घेऊन लग्न करेन, पण मला पायलट व्हायचं आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे,” असं म्हणत आरोपी महिलेने पायलट आतिष शिंगे यांच्याकडे पैशांची मागणी केली. दरम्यानच्या काळात महिलेने पायलट होण्यासाठी शिंगे यांच्याकडून ५८ लाख ९२ हजार रुपये घेतले.
मुंबई, मिरज व मंगळुरु अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम घेतली. यावेळी आरोपी महिलेने रकमेची परतफेड पायलट झाल्यावर करते असं सांगितलं. मात्र, पैसे परत मिळत नाहीत व लग्नही करत नाही असे लक्षात येताच शिंगे यांनी पैशाची मागणी केली. ही महिला गेली सहा वर्षे शिंगे यांच्या संपर्कात होती. या दरम्यान विश्वास वाढत गेल्याने आपण व्यवहार केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.