मुंबईतील इमारतीला लागली भीषण आग

मुंबईतील (Mumbai) कांजूरमार्ग परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे.
Mumbai Fire News
Mumbai Fire NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. विक्रोळी कांजूरमार्ग परिसरात पूर्वेला असलेल्या एनजी रॉयल पार्क सोसायटीच्या बी विंगमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. 11 मजली इमारतीच्या नवव्या आणि दहाव्या मजल्यावर आग लागली. (A Huge Fire Broke Out In A Building In Mumbai)

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai) विक्रोळी-कांजूरमार्ग पूर्व परिसरात असलेल्या या इमारतीला लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. (Mumbai Fire News Update)

Mumbai Fire News
'मी आमरण उपोषण मागे घेणार नाही'... संभाजीराजे उपोषणावरती ठाम

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग दुपारी एक वाजता लागली आहे. अग्निशमन दलाने लेव्हल 2 ची आग असल्याचे सांगितले आहे. दुपारी 1.15 च्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांत अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

कोणतीही जीवितहानी झाली नाही

दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विक्रोळी-कांजूरमार्ग परिसरात पूर्व भागात एनजी रॉयल पार्कची इमारत आहे. ही इमारत अकरा मजली आहे. सोमवारी दुपारी त्याच्या नवव्या आणि दहाव्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर बघता बघता आगीचा भडका उडाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल-2 ची आहे. दुपारी 1.15 च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. यानंतर अग्निशमन दलाचे (Fire Brigade) पथक पंधरा ते वीस मिनिटांत अग्निशमन दलाच्या सहा गाड्या, चार जंबो टँकर, दोन पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका व इतर साधनसामग्रीसह घटनास्थळी पोहोचले आणि आग विझविण्याचे काम सुरु केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com