महाराष्ट्रातील पालघरमध्ये सात वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची (Zika virus) लागण झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, ही मुलगी पालघर जिल्ह्यातील झाई येथील आश्रमशाळेतील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी 2021 मध्ये पुण्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. आरोग्य विभागाने सांगितले की, "झाई येथील आश्रमशाळेत 7 वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. यापूर्वी जुलै 2021 मध्ये पुण्यात पहिला रुग्ण आढळून आला होता.
झिका व्हायरसची लक्षणे
ताप
सांधे दुखी
डोकेदुखी
त्वचेवर पुरळ
स्नायू दुखणे
उलट्या
पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. झिका विषाणू हा देखील डासांमुळे पसरणारा धोकादायक आजार आहे. हा संसर्ग डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. एडिस डासाच्या चाव्याव्दारे त्याचा प्रसार होतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात जावे लागते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.