Michael Lobo : संसदेत गोव्याच्या बेरोजगारीचा विषय ही राज्याची नाचक्कीच!

गोवा सरकारने गुजरात सरकारच्या मॉडेलचे मार्गदर्शन घेण्याचाही सल्ला
Michael Lobo | Congress vs BJP
Michael Lobo | Congress vs BJPDainik Gomantak

Michael Lobo : राज्यातील वाढती बेरोजगारी हा चिंतेचा विषय असून, संसदेमध्ये गोव्यातील बेरोजगाराचा मुद्दा प्रामुख्याने गाजल्याने राज्याची पुरती नाचक्की झाली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील बेरोजगारीची टक्केवारी ही मोठी आहे. मागील सात वर्षांपासून ही बेरोजगारी वाढते आहे. उच्च शिक्षण घेऊनही आज युवकांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे हा चिंतेचा विषय असून, सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी मायकल लोबो यांनी केली आहे.

गोव्यात नवीन औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारने प्रशासकीय लालफितीचा अडथळा दूर करावा. मंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत नवीन औद्योगिक गुंतवणुकीसाठी ‘एक खिडकी’ प्रणाली राबवावी, जेणेकरून राज्यात व्यवसाय करणे सुलभ होईल व एकाच छताखाली सर्व परवाने मिळतील, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी सायंकाळी ते कळंगुट येथील कार्यालयात माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, बेरोजगारीचा प्रश्न सरकारी नोकऱ्यांद्वारे सुटणार नाही. राज्यात नवीन औद्योगिक गुंतवणूक करताना लालफितीचा सामना करावा लागतो. याचे प्रमुख कारण सरकारची अनास्था व एक खिडकी प्रणालीचा अभाव, असा आरोपही लोबोंनी केला.

Michael Lobo | Congress vs BJP
Festival of Goa : राय येथील प्रसिद्ध कणसांचे फेस्त उत्साहात संपन्न

गुजरात मॉडेलचा अभ्यास करा

लोबो म्हणाले, गोवा सरकारने गुजरात सरकारच्या मॉडेलचे मार्गदर्शन घ्यावे. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे ‘एक खिडकी’ प्रणाली राबविली होती. अशावेळी मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांनी तिथे जाऊन या गुजरात मॉडेलचा अभ्यास करावा, असा सल्ला लोबो यांनी दिला.

पदवीधर व उच्चशिक्षित असूनही नोकरी नसल्याने सध्या युवावर्ग तणावाखाली आहे. नोकरी नसल्याने तरुणांचे मानसिक खच्चीकरण होते आहे. सध्या नोकरी नसल्याने अनेकजण स्वतःला घरात कोंडून घेताहेत. यावर राज्य सरकारने तातडीने मार्ग काढणे आवश्‍यक आहे, असेही मायकल लोबो पुढे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com